मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे आमिर खान याची पोलिसात धाव, एफआयआर दाखल

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे आमिर खान याची पोलिसात धाव, एफआयआर दाखल

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 17, 2024 08:00 AM IST

सध्या सोशल मीडियावर आमिर खान याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून त्याने पोलिसात धाव घेतली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे आमिर खान याची पोलिसात धाव, एफआयआर दाखल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे आमिर खान याची पोलिसात धाव, एफआयआर दाखल

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान हा सध्या चर्चेत आहे. या चर्चा आमिर खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत. आमिरने जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा त्याने पोलिसात धाव घेतली आहे. या प्रकरणी त्याने एफआर दाखल केला आहे. तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा फेक असल्याचे देखील सांगितले आहे. या संबंधी त्याने एक निवेदन जारी केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे प्रकरण?

सध्या सोशल मीडियावर आमिर खानचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत आमिर खान एका विशष्ट राजकीय पक्ष्या विषयी बोलत असून त्यांचा प्रचार करताना दिसत आहे. त्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन आमिर खान करत असल्याचा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.
वाचा: 'या' उत्तराने लारा दत्ता हिने जिंकला ‘मिस युनिव्हर्स’चा ताज; परीक्षकही झाले होते थक्क

व्हिडीओवर आमिर खानची प्रतिक्रिया

आमिर खानने सोशल मीडियावर एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यामध्ये त्याने, 'आमिर खानने त्याच्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत कधीही कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन केलेले नाही. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आमिर खानने निवडणूक आयोगाच्या जनजागृती मोहिमेद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आढळून आले आहे. या व्हिडीओमध्ये आमिर एका विशिष्ट पक्षाचा प्रचार करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा व्हिडीओ फेक असून पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे'असे म्हटले आहे.
वाचा: ‘गॅलेक्सी’ अपार्टमेंटमधील 1BHK फ्लॅट सोडण्यास सलमान खान तयार का नाही? काय आहे कारण

पुढे त्याने निवेदनात उल्लेख केला की, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबाबत आमिर खानने संबंधित अधिकाऱ्यांकडे, यंत्रणांकडे तक्रार नोंदवली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईमकडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सायबर विभागाने व्हिडीओ विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
वाचा: अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'या' मराठी सिनेमात करणार काम

आमिरने केले जनतेला आवाहन

आपण कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करत नसलो तरी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा अधिकार बजवायला हवा असे आवाहन आमिर खानने केले आहे. मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे असे देखील आमिर खान म्हणाला.

IPL_Entry_Point

विभाग