बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी गोळीबार झाल्यानंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. गेल्या दोन दशकांपासून वास्तव्यास असलेल्या मुंबईतील वांद्रे इथल्या राहत्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या फ्लॅटवर गोळीबार झाला. वांद्रे पश्चिम भागातील बँडस्टँड परिसरात हे अपार्टमेंट आहे. हे मुंबईतल्या प्रमुख पर्यटन ठिकाणांपैकी एक असून तिथे सतत असंख्य लोक फिरायला येत-जात असतात. तरीसुद्धा सलमानचे हे घर फारसे मोठे आणि आलिशान नाही. हा एक वन बिएचके प्लॅट असून सलमान या घरात राहात आहे. पण सलमान इतक्या छोट्या का राहात आहे? असा प्रश्न अनेकदा लोकांना पडला आहे. स्वत: सलमानने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सलमानने २००९ साली कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानच्या चॅट शोमध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटमधील वन बीएचके प्लॅटमध्ये राहण्यामागचे कारण सांगितले होते. त्यामधील मुख्य कारण म्हणजे सलमानचे आई-वडील आहेत. आई सलमा खान यांच्या जवळ राहता यावे म्हणून सलमान गेल्या वीस वर्षांपासून या छोट्या फ्लॅटमध्ये राहत आहे. “तू वर्ल्ड सुपरस्टार आहेस आणि कोट्यवधींमध्ये तुझी कमाई सुरु आहे. पण तरीही तू वन बीएचके फ्लॅटमध्ये का राहतोस. तुझ्या घराखालीच आईचे देखील घर आहे” असे फराह खान म्हणाली होती. त्यावर उत्तर देत सलमान म्हणाला की, “होय, खरेतर हा फ्लॅट तीन बेडरुम आणि एक हॉल असलेला आहे. पण नंतर तो वन बीएचके कसा झाला हे मलाही माहीत नाही. पण आईवडिलांच्या जवळ राहण्याचे एक वेगळेच सुख आहे.”
वाचा: घरावर गोळीबार झाला तेव्हा अभिनेता सलमान खान नेमका कुठे होता? मोठी अपडेट आली समोर
रविवारी पहाटेच्या वेळी सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीने आपले संपूर्ण शरीर हे काळ्या रंगाच्या कपड्यांनी झाकल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की दोन व्यक्ती दुचाकीवरून येतात, फायरिंग करतात आणि तेथून पळ काढतात. त्यानंतर या दोन व्यक्तींची ओळख पटली आहे. पनवेलमध्ये राहणाऱ्या तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तसेच एकाला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.
वाचा: 'हे सगळं नाटक आहे', सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारावर अभिनेत्याची प्रतिक्रिया