'हे सगळं नाटक आहे', सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारावर अभिनेत्याची प्रतिक्रिया
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'हे सगळं नाटक आहे', सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारावर अभिनेत्याची प्रतिक्रिया

'हे सगळं नाटक आहे', सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारावर अभिनेत्याची प्रतिक्रिया

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 15, 2024 10:14 AM IST

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या रविवारी घरावर गोळीबार झाला आहे. या गोळीबारावर एका अभिनेत्याने प्रतिक्रिया देत सलमानला सुनावले आहे.

'सगळं नाटक आहे', सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारावर अभिनेत्याची प्रतिक्रिया
'सगळं नाटक आहे', सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारावर अभिनेत्याची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार झाल्यानंतर खळबळ उडाली. अज्ञात व्यक्तींनी पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी काळ्या रंगाचे कपडे घालून सलमानच्या घरावर गोळीबार केला. या गोळीबारातील एक गोळी सलमानच्या घरात गेली आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. पण या प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. दरम्यान, बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने सलमान खानवर निशाणा साधला आहे. त्याने 'हे सगळं नाटक आहे' असे म्हणत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या अभिनेत्याची ही पोस्ट चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर निशाणा साधणारा हा अभिनेता आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमल राशिद खान उर्फ केआरके आहे. कोणीची विचारले नसताने स्वत:चे प्रत्येक गोष्टीवर मत मांडणारा हा अभिनेता नेहमीच नेटकऱ्यांच्या रडारावर असतो. कलाकार केआरकेकडे फारसे लक्ष देत नसले तरी नेटकऱ्यांचे चांगले मनोरंजन होते. आता केआरकेने सलमानवर निशाणा साधला आहे.
वाचा: सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज आलं समोर, आरोपी दुचाकीवरून आला अन्...

काय आहे केआरकेची पोस्ट?

'हे सगळे सलमानचे नाटक आहे. सल्लू भारतातील सर्वात मोठा गँगस्टर आहे आणि इतर गँगस्टर त्याच्यासाठी काम करतात. त्यांनी सकाळी ५ वाजता गोळीबार का केला? जेव्हा सगळे झोपलेले असतात. पब्लिसिटी आणि लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. कारण त्याला माहिती होते की मी सुशांत सिंह राजपूतसोबत नेमके काय झाले याचा खुलासा करणार होतो' या आशयाची पोस्ट केआरकेने केली आहे.
वाचा: 'तारक मेहता..' मालिकेतील सोनूचा एअरपोर्टवर अतरंगी कारनामा, काही सेकंदामध्येच तयार केला टॉप

केआरकेची आणखी एक पोस्ट?

पुढे केआरकेने आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की सलमान खानचे वडील याला पब्लिसिटी स्टंट बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे. 'सलीम खान साहेब हे अतिशय इमानदार व्यक्ती आहेत. त्यांनी खरे सांगितले आहे की हा पब्लिसिटी स्टंट आहे' या आशयाची पोस्ट केआरकेने केली आहे.
वाचा: बॉक्स ऑफिसवर 'बडे मियां छोटे मियां' सिनेमाचा धुमाकूळ, तीन दिवसातच कमावले इतके कोटी

सलमान खान कुठे होता?

गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा नेमका कुठे होता? असा प्रश्न सतत सर्वांच्या मनात येत आहे. यावर पोलिसांकडून, ज्यावेळी गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. तो आपल्या संपूर्ण कुटुंबियांसोबत होता अशी माहिती दिली आहे.

Whats_app_banner