भारतीय टेलिव्हिजन विश्वातील सर्वात जास्त काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा.' या मालिकेचा एक वेगळा चाहता वर्ग असल्याचे पाहायला मिळत आहे. जवळपास दोन दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने एक वेगळी छाप सोडली आहे. अनेक कलाकारांनी मालिका सोडल्या तरीही प्रेक्षक आजही त्यांच्याविषयी जाणून घेताना दिसतात. आता मालिकेतील सोनूचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिने जे काही केले आहे ते पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत झील मेहताच्या जागी तरुण सोनालिका उर्फ सोनू ही भूमिका अभिनेत्री निधी भानुशालीने साकारली होती. तिची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. सोनूही मालिकेत दिसत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकत असते. तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. ती सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही शेअर करताना दिसते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
वाचा: छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय; निवडणूक प्रचारात अपमान झाल्यानं किरण माने भडकले, म्हणाले…
निधी भानूशालीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बराच वेळ विमानतळावर घालवताना दिसत आहे. विमानतळावर बसून काय करणार म्हणून सोनूने एक शक्कल लढवली आहे. तिने मिळालेल्या खाली वेळात इंद्रधनुष्याच्या रंगाच्या लोकरने क्रॉप टॉप विणला आहे. तिने व्हिडीओच्या शेवटी हा क्रॉप टॉप परिधान केला आहे. तिचा हा क्रॉप टॉप अतिशय सुंदर दिसत आहे.
वाचा: वसु आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका वेगळ्या वळणावर
निधी भानूशालीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत 'विमानतळावर तुम्ही कसा वेळ घालवता' असा प्रश्न विचारला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट करत सोनूने रिकाम्या वेळेत केलेल्या कामाचे कौतुक केले आहे. एका यूजरने 'आम्ही हा टॉप खरेदी करु शकतो का? प्लीज' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'तुझ्या हातामध्ये उत्कृष्ट टॅलेंट आहे' असे म्हणत निधीचे कौतुक केले आहे.
वाचा: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरने पत्र लिहून मागितली मुक्ताची माफी, काय असेल आता तिचे पुढचे पाऊल? वाचा