'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मराठी नवीन वर्षातील पहिला सण गुढी पाडवा साजरा केला जात आहे. इंद्रा मुक्ताला गुढी पाडव्याची तयारी करण्यास सांगते. मुक्ताची तब्येत बरी नाही, हे लक्षात घेऊन सागरने पहाटे उठून गुढीपाडव्याची तयारी केली आहे. या नव्या वर्षात आता सागर-मुक्ताच्या नात्यातील कडवटपणा जाऊन प्रेमाचा गोडवा येणार का? हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. सागरने मुक्तासाठी चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीमध्ये त्याने माफी मागितली असून प्रेमाची कबूली देखील दिली आहे. त्यामुळे मुक्ता काय करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
लग्नानंतर सागर आणि मुक्ता या दोघांचाही पहिला गुढीपाडवा असतो. दोघेही गुढी उभारण्यास जातात तेव्हा माधवी आणि पुरू देखील गुढीची पूजा करण्यासाठी आलेले असतात. मुक्ता तिची आई माधवीला सागरसोबत असलेल्या भांडणाबाबत पुरूला काहीही न सांगण्याची विनंती करते. पण, पुरुला थोडा संशय येतो. तो माधवीला काही लपवतेस का असा प्रश्न विचारतो. सागर आणि मुक्तामध्ये सगळे काही व्यवस्थित आहे का, असा थेट प्रश्न पुरू माधवीला विचारतो. माधवी मात्र त्याच्या या प्रश्नाचे उत्तर देताना टाळाटाळ करते. कोळी कुटुंब आनंदाने गुढीपाडवा सण साजरा करतात. मुक्ता सईला गुढी पाडव्याचे नेमके काय महत्त्व आहे हे सांगते.
वाचा: प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
गेल्या काही दिवसांपासून कार्तिक सतत कुटुंबीयांसमोर चांगुलपणाचा आव आणतो. मात्र, मुक्ताला त्याचा खरा चेहरा माहिती असतो. घरात काम करणाऱ्या बाईला मदत केल्यामुळे इंद्रा कार्तिकचे कौतुक करत असते. कार्तिक देखील ड्रामा करतो. पण मुक्ताला या सगळ्याचे काहीच वाटत नाही. कारण तिला कार्तिकचा हेतू माहिती असतो
वाचा: ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर लाठीचार्ज
मुक्ता सागरवर नाराज आहे. त्याने केवळ आदित्यसाठी आपल्यासोबत प्रेमाचे खोट नाटक केले असे मुक्ताला वाटत असते. ती सागरसोबत निटही वागत नाही. शेवटी सागर मुक्ताला पत्र लिहितो आणि माफी मागतो. आता मुक्ता सागरला माफ करेल का? हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
वाचा: 'आजकाल केवळ दिखावा आणि फायद्यासाठी कलाकार लग्न करत आहेत', नोरा फतेही हिचे खळबळजनक विधान