प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' सिनेमा? वाचा रिव्ह्यू-akshay kumar and tiger shroff bade miyan chote miyan movie public review ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' सिनेमा? वाचा रिव्ह्यू

प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' सिनेमा? वाचा रिव्ह्यू

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 11, 2024 04:13 PM IST

नुकताच बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला हे चला जाणून घेऊया...

प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' सिनेमा, वाचा रिव्ह्यू
प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' सिनेमा, वाचा रिव्ह्यू

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवर मजामस्ती करतानाचे दोघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. आज ईदच्या मुहूर्तावर 'बडे मियां छोटे मियां' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट कसा आहे? चित्रपटाची कथा काय आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया चित्रपटाविषयी...

'बडे मियां छोटे मियां' हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. भारत-पाकिस्तान आणि दहशतवाद या गंभीर मुद्द्यांवर आधारित असलेल्या 'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. काही यूजरने चित्रपटात अॅक्शनचा भरणा असल्याचे म्हटले आहे. तर काही यूजरने चित्रपट आणखी चांगला होऊ बनू शकला असता असे म्हटले आहे.
वाचा: गेल्या महिनाभरापासून जुई गडकरी आजाराने त्रस्त, तरीही करते शुटिंग; काय झालं नेमकं जाणून घ्या?

सोशल मीडियावर प्रेक्षकांनी दिल्या प्रतिक्रिया

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मियां छोटे मियां' चित्रपटाला सोशल मीडियावर संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एका यूजरने टायगर श्रॉफची प्रशंसा करत चित्रपट चांगला असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने भारत-पाकिस्तानवर आधारित असलेली ही कथा जुनी आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने चित्रपटात केवळ अॅक्शनचा भरणा आहे. कथेमध्ये दम नाही असे स्पष्ट सांगितले आहे. पण इतर यूजरने चित्रपट चांगले असल्याचे सांगितले आहे. तसेच कुटुंबासोबत पाहण्यासारखा चित्रपट असल्याचे म्हटले आहे.
वाचा: ‘देवमाणूस’मधील किरण गायकवाड पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेत दिसणार की सिनेमा येणार?

अक्षय-टायगरची जोडी

'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटाची गेल्या वर्षी प्रोमोच्या माध्यमातून करण्यात आली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीमधील दोन मोठे अॅक्शन स्टार अक्षय आणि टायगरला एकत्र पाहण्याची सुवर्ण संधी प्रेक्षकांना मिळाली आहे. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आज अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला सुट्टीचा फायदा झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओमध्ये असंख्य प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये जाताना दिसत आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली असल्याचे म्हटले जाच आहे.
वाचा: 'मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही', मराठमोळ्या अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

Whats_app_banner