'मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही', मराठमोळ्या अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही', मराठमोळ्या अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

'मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही', मराठमोळ्या अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Apr 10, 2024 02:42 PM IST

इंटिमेट सीन्स पडद्यावर जसे दिसतात त्या पेक्षा जेव्हा ते शूट होतात तेव्हा कलाकारांसमोर मोठे आवाहन असते. पण नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने 'मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही' असे वक्तव्य केले आहे.

'मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही', मराठमोळ्या अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
'मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही', मराठमोळ्या अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

आजकाल जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये बोल्ड आणि इंटिमेट सीन्स हे असतातच. पण हे बोल्ड सीन शूट करणे कलाकारांसाठी सर्वाधिक आव्हानात्मक असते. अनेकदा अभिनेत्रींना या बोल्ड सीन्समुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. आजकाल मराठी चित्रपटांमध्ये ही बोल्ड सीन्स सरास असल्याचे पाहायला मिळते. नुकताच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने इंटिमेट सीन्स देण्यावर वक्तव्ये केले आहे. तिने बेधकपणे इंटिमेट सीनवर तिचे मत मांडले आहे.

मराठी इंडस्ट्रीमधील अभिनेत्री प्रिया बापट, सई ताम्हणकर, राधिका आपटे, अमृता सुभाष आणि इतर काही अभिनेत्रींनी इंटिमेट सीन्स अगदी बिनधास्तपणे दिले आहेत. या अभिनेत्रींमध्ये स्मिता तांबेचे देखील नाव घेतले जाते. नुकताच स्मिताने एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये इंटीमेट सीन्स देण्यावर बिनधास्त मत मांडले आहे. तिच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या जरी असल्या तरी स्मिताने तिचा एक अभिनेत्री म्हणून काम करताना येणारा अनुभव योग्य पद्धतीने सांगितला आहे.
वाचा: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सई ताम्हणकरची स्वप्नपूर्ती! खरेदी केली नवी आलिशान गाडी

काय म्हणाली स्मिता तांबे?

स्मिताने नुकतीच 'इट्स मज्जा' या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने इंटिमेट सीन देण्यापूर्वी स्वत:ला कसे समजावले, कशी मानसिक तयारी केली या सगळ्या गोष्टींवर भाष्य केले आहे. 'मी कधीही किसिंग सीन्स देताना अस्वस्थ होणार नाही यावर मला पूर्ण विश्वास आहे. मी निलेश दिवेकरसोबत कँडल मार्च चित्रपटात इंटीमेट सीन्स दिला होता. त्यावेळी सेटवरच्या सर्वांना अवघडल्यासारखे झाले, पण मला मात्र अजिबात काही विचित्र वाटले नाही. तेव्हा मी निलेशलासुद्धा सांगितले होते. असे सीन करताना मला लाज वाटत नाही. कारण,ती त्या पात्राची गरज असते आणि तो एक सरावाचाच भाग आहे' असे स्मिता म्हणाली.
वाचा: 'स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण', गुढीपाडव्यानिमित्त माधुरी दीक्षितने शेअर केला मराठमोळा अंदाजातील व्हिडीओ

पुढे ती म्हणाली की, 'त्या पात्राची ज्याप्रमाणे भांड उचलण्याची विशिष्ठ पद्धत असते, पाणी पिण्याची एक वेगळी पद्धत असते, उठण्याची, बसण्याची लकब असते, त्याचप्रमाणे हे देखील अगदी सहज दृश्य आहे. त्या चित्रपटाच्या कथेनुसार जर इंटीमेट सीनची गरज असेल तर मग ते कधीच विचित्र किंवा वल्गर वाटत नाहीत.'
वाचा: अजय देवगणचा 'मैदान' चित्रपट कसा आहे? थिएटरमध्ये जाण्यापूर्वी रिव्ह्यू नक्की वाचा

Whats_app_banner