'शैतान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर अजय देवगणचा 'मैदान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 'दृश्यम','सिंघग','शैतान' असे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अजय देवगणकडून प्रेक्षकांचा अपेक्षा उंचावल्या आहेत. आता त्याचा 'मैदान' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे. आता चित्रपट कसा आहे चला जाणून घेऊया...
'मैदान' हा चित्रपट भारतातील १९५० ते १९६० या सोनेरी काळातील आहे. या चित्रपटात कोच सय्यद अब्दुल रहीम यांची कथा दाखवण्यात आली आहे. या कथेमध्ये अगदी बारीक-सारीक गोष्टींकडे देखील लक्ष टाकण्यात आले आहे. सय्यद यांच्या आयुष्याचे एकच धैय्य होते की त्यांना एक विजेती टीम तयार करायची आणि भारतीय फुटबॉल टीमला देशाच्या नकाशावर एक वेगळी ओळख निर्माण करुन द्यायची.
वाचा: 'ए भीडू' म्हणत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी चाहत्याच्या मारली टपलीत, पाहा मजेशीर व्हिडीओ
चित्रपटात एक रोमांचक मॅच दाखवण्यात आली आहे. ती पाहाताना प्रेक्षक अक्षरश: तोंडात बोटं घालताना दिसत आहेत. चक दे इंडिया चित्रपटात शाहरुख खानची शेवटची मॅच ज्या प्रकारे सर्वांचे लक्ष वेधून घेते त्याच प्रकारे अजय देवगण त्याच्या टीमला प्रोत्साहन देताना दिसत आहे. 'मॅच में उतरना ११ लेकीन दिखना एक' असा अजयचा डायलॉग सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. चित्रपटात आणखी एक सीन दाखवण्यात आला आहे ज्यामध्ये अजय सामन्यापूर्वी स्टेडियमला भेट देतो. पाण्यांच्या फवाऱ्यामागून दाखवण्यात आलेला अजय देवगणचा चेहरा तुम्हाला चक दे इंडियामधील शाहरुख खानची आठवण करुन देईल. बाकी चित्रपटाची तक्रार करावी असा एकही सीन दाखवण्यात आलेला नाही.
वाचा: रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचा अखेर घटस्फोट होणार, चैन्नई कोर्टात अर्ज दाखल
चित्रपटात काही ठिकाणी काही सीन हे कथा सांगत असल्याचे आपल्याला जाणवतील आणि या सीनची काहीच गरज नसल्याचे देखील भासेल. ३ तासांचा हा चित्रपट तुम्हाला सुरु कधी झाला आणि संपला कधी कळणारही नाही. प्रत्येक पात्रायाला कथेमध्ये योग्य ते स्थान देण्यात आल्यामुळे अमित शर्मा ३ तास प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी झाल्याचे दिसत आहे.
वाचा: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लढणार लोकसभा निवडणूक? स्वत: प्रतिक्रिया देत केला खुलासा
'मैदान' चित्रपटात भारतीय फुटबॉल टीमचे कोच रहीम यांची कथा दाखवण्यात आली आहे. कथा १९५२ साली फिनलँडमध्ये आयोजित केलेल्या ऑलंपिकमध्ये भारताला मिळालेल्या अपयाशानंतर सुरु होते. सय्यद अब्दुल रहीम हे भारतीय टीमला ऑलंपिक्स आणि एशियन गेम्समध्ये जिंकण्याचा हट्ट करतात. ते फेडरेशनला अपील करतात की त्यांना टीम निवडण्याची परवानगी द्या. देशातील गल्लीबोळात फिरुन ते एक टीम शोधतात. ते ब्राझील ऑफ एशिया आणि टीम ऑफ कमबॅक हा पुरस्कार जिंकून देतात. यावर आधारित ही संपूर्ण कथा आहे.
संबंधित बातम्या