बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. वेस्टर्न असो किंवा पारंपरिक कोणत्याही लूकमध्ये माधुरी चाहत्यांवर मोहिनी घालताना दिसते. आज गुढीपाडव्यानिमित्त माधुरी दीक्षितने मराठमोळ्या अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा शुभेच्छा देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेतय
माधुरी दीक्षितने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने हिरवी पैठणी साडी नेसली आहे. तसेच नाकात नथ, हातात पाटल्या, मोकळे केस, कपाळी टीकली अशा मराठमोळ्या लूकमध्ये ती दिसत आहे. सणानिमित्त मराठमोळा लूक करून चाहत्यांना शुभेच्छा दिल्याने सध्या माधुरी दीक्षितच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
वाचा: 'ए भीडू' म्हणत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी चाहत्याच्या मारली टपलीत, पाहा मजेशीर व्हिडीओ
माधुरी दीक्षित व्हिडीओमध्ये “चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा…मंगलमय गुढी, ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!” असे बोलताना दिसत आहे. अनेकांनी माधुरीचे कौतुक करत हा व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.
वाचा: रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचा अखेर घटस्फोट होणार, चैन्नई कोर्टात अर्ज दाखल
माधुरी दीक्षित निर्मित 'पंचक' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाता आदिनात कोठारे, तेजश्री प्रधान आणि इतर काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर माधुरी आता सोनी वाहिनीवरील 'डान्स दिवाने' या कार्यक्रमात परिक्षक म्हणून दिसत आहे. आता चाहते माधुरीच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहात आहेत.
वाचा: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लढणार लोकसभा निवडणूक? स्वत: प्रतिक्रिया देत केला खुलासा
यापूर्वी अभिनेता रितेश देशमुखने मुलांसोबत गुढी उभारतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ देशमुखांची सून जिनिलियाने शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘'पहाटे लवकर उठून गुढी उभरली. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा'’ असे कॅप्शन दिले होते. त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षितचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनी देखील चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांच्या ही व्हिडीओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
संबंधित बातम्या