मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढी पाडव्याने होते. त्यामुळे अनेक मराठी लोक नवनवे संकल्प करताना दिसतात. त्यामध्ये कलाकारही मागे नाहीत. अभिनेत्री सई ताम्हणकरने देखील पाहिलेले एक स्वप्न नुकताच पूर्ण झाले आहे. सईने मराठी नवीन वर्षात एक नवी आलिशान गाडी खरेदी केली आहे. तिने गाडी खरेदी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
२०२४ या वर्षात सात्यत्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारून सईने अनेक प्रोजेक्ट स्विकारले आहेत. आता सईची एक स्वप्नपूर्ती झाली आहे. असे म्हणतात ना "स्वप्न पाहिली आणि त्या स्वप्नासाठी अपार मेहनत केली की आपली स्वप्न सत्यात उतरतात" तसचे काहीसे सई सोबत झाले आहे. सईचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे. सईने एक आलिशान गाडी खरेदी करत चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. मर्सिडीज बेंझ ही नवी कोरी गाडी गुढी पाडव्याच्या शुभदिनी सई घरी घेऊन आली आहे.
वाचा: 'ए भीडू' म्हणत अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी चाहत्याच्या मारली टपलीत, पाहा मजेशीर व्हिडीओ
मेहनती असलेली सई २०२४ वर्षात बॅक टू बॅक बॉलिवुड आणि मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. पण या सोबतच तिने स्वतःचे खास स्वप्न देखील पूर्ण केले आहे. एखाद्या गोष्टीसाठी असलेली जिद्द आणि त्यासाठी दिवस रात्र एक करून सई काम करताना दिसत आहे. या कामातून तिला चांगलेच यश मिळाले आहे. तिने एक नवी कोरी गाडी खरेदी केली असून ती स्वत:ला गिफ्ट केली आहे.
वाचा: रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या आणि धनुष यांचा अखेर घटस्फोट होणार, चैन्नई कोर्टात अर्ज दाखल
सई नेहमीच स्वतःच्या जोरावर काम करताना दिसली आहे. एक सशक्त अभिनेत्री ते सेल्फ मेड वुमन हा तिचा प्रवास हा अनेकांना प्रेरणा देऊन जातो. सईचा आजवरचा इंडस्ट्रीतील प्रवास असो किंवा वैयक्तिक आयुष्यात झालेली तिची स्वतःची प्रगती ती कायम एक सशक्त माणूस आहे यातून कायम दिसून येत. प्रत्येक गोष्ट उत्तम झाली पाहिजे हा तिचा कायम अट्टाहास असतो. सई सशक्त अभिनेत्री आणि स्त्री आहे हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सईची नव्या वर्षाची सुरुवात तर दमदार झाली आहे पण इथे न थांबता वर्षभर ती प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी देखील सज्ज आहे.
वाचा: बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लढणार लोकसभा निवडणूक? स्वत: प्रतिक्रिया देत केला खुलासा
"श्री देवी प्रसन्न" , "भक्षक", "डब्बा कार्टल ", "अग्नी ", "ग्राउंड झिरो " आणि इतर काही चित्रपटामध्ये सई दिसली आहे. तर काही चित्रपटांमध्ये दिसणार आहे. २०१४ हे वर्ष सईसाठी खास असणार असे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रेक्षक सईच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या