'ए भीडू' म्हणत अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ. त्यांचा प्रत्येक चित्रपट तुफान हिट झाल्याचे पाहायला मिळत आहे. इतके यश आणि प्रसिद्धी मिळवून देखील जॅकी श्रॉफ नेहमीच आपल्या मातीशी नाळ जोडून राहिलेले दिसतो. ते नेहमी चाहत्यांशी आणि फोटोग्राफर्सशी संवाद साधताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते चाहत्याच्या टपलीत मारताना दिसत आहेत.
वाचा: नियंत्रण सुटल्यामुळे सुपरस्टार अजित कुमार याच्या गाडीचा भीषण अपघात, व्हिडीओ आला समोर
नुकताच जॅकी श्रॉफ हे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. दरम्यान त्यांनी पँट, काळ्या रंगाचा टी-शर्ट, सनग्लासेस, कॉटनची बॅग, डोक्यावर टोपी आणि दोन्ही हातात दोन रोपे घेतली होती. त्यांचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. अशातच जॅकी यांना पाहून चाहत्यांनी गर्दी केली. एक चाहता सेल्फी घेण्यासाठी जवळ आला. तो चुकीच्या जागी बाजूला उभा असल्यामुळे जॅकी यांनी त्याच्या टपलीत माकली. तर दुसऱ्या एका चाहत्याने चुकीची पोझ दिल्यामुळे जॅकी श्रॉफ यांनी मजेशीर अंदाजात त्याला ए भीडू असा आवाज दिला. सध्या सोशल मीडियावर जॅकी श्रॉफ यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
वाचा: शाहरुख, सलमान आणि आमिरही आम्हाला घाबरतात; पाकिस्तानी अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
सोशल मीडियावर जॅकी श्रॉफ यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. एका यूजरने 'जग्गू दादा यांना बॉडीगार्डची गरज नाही' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या यूजरने 'एका फोटोसाठी त्यांनी किती जोरात मारले'असे म्हटले आहे. तिसऱ्या एका यूजरने 'टपली थोडी जोरात मारली जग्गू दादा' असे म्हणत जॅकी श्रॉफला सुनावले आहे.
वाचा: 'राजकारणात नव्या विचारसरणीची गरज आहे', सई ताम्हणकरच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
काही दिवसांपूर्वी जॅकी श्रॉफ यांचा 'मस्त मैं रहेना का' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात जॅकी यांच्यासोबत नीना गुप्ता महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय मौर्या यांनी केले आहे. हा चित्रपट ८ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने सर्वांचे लक्ष वेधले होते.