आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. काही मतदारसंघातील एक उमेदवार ठरला आहे तर विरोधी उमेदवार ठरणे अद्याप बाकी आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता संजय दत्त निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे. यावर स्वत: संजय दत्तने प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, संजय दत्त हा हरियाणामधून लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या विरोधात काँग्रेस पक्षातून संजय दत्त निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यावर संजय दत्तने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. नुकताच त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
वाचा: 'या' नाटकाच्या १००व्या प्रयोगासाठी अभिनेत्री प्रिया बापट हिने गायले गाणे, पाहा व्हिडीओ
'मी एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश करत असल्याच्या चर्च मला संपवायच्या आहेत. मी राजकारणात प्रवेश करत नाही. जर मला राजकारणात प्रवेश करायचा असेल तर मी त्याबाबत नक्की घोषणा करेन. माझ्याविषयी ज्या चर्चा सुरु आहेत कृपया त्यावर विश्वास ठेवू नका' या आशयाची पोस्ट संजय दत्तने सोशल मीडिया अकाऊंटवर केली आहे.
वाचा: नियंत्रण सुटल्यामुळे सुपरस्टार अजित कुमार याच्या गाडीचा भीषण अपघात, व्हिडीओ आला समोर
संजय दत्तचे कुटुंबीय हे राजकारणात अनेकदा सहभागी झाले आहेत. त्यामुळे पुढे जाऊन संजय दत्त देखील राजकारणात प्रवेश करु शकतो असे म्हटले जात आहे. संजय दत्तचे वडील सुनील दत्त हे यूपीए सरकारमध्ये मंत्री होते. काँग्रेस पक्षातून त्यांनी उत्तर आणि पश्चिम मुंबईतून जवळपास ५ वेळा निवडणूक लढवली आहे. या निवडणूकांमध्ये त्यांना योग्य ते यश देखील मिळाले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी प्रिया दत्तने राजकारणात प्रवेश केला होता. त्यामुळे संजय दत्त देखील राजकारणात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या.
वाचा: शाहरुख, सलमान आणि आमिरही आम्हाला घाबरतात; पाकिस्तानी अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
संजय दत्त लवकरच बाप आणि वेलकम टू द जंगल या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट कॉमेडी आहेत. त्यापूर्वी तो जवान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.
संबंधित बातम्या