दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांची मुलगी, निर्माती ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. जानेवारी २०२२मध्ये या जोडीने वेगळे होत असल्याची माहिती दिली होती. पण काही दिवसांपूर्वी ते दोघे पुन्हा एकत्र येत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता त्यांनी घटस्फोटाचा अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे.
इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानुसार, ऐश्वर्या आणि धनुष यांनी चैन्नई कौटुंबिक कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. कलम १३ ब अंतर्गत त्यांचा हा घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर दोघांनीही अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा दोघांच्या कुटुंबीयांनी देखील वक्तव्य केलेले नाही.
वाचा: नियंत्रण सुटल्यामुळे सुपरस्टार अजित कुमार याच्या गाडीचा भीषण अपघात, व्हिडीओ आला समोर
गेल्या दोन वर्षांपासून ऐश्वर्या आणि धनुष हे वेगळे राहात आहेत. त्यांना दोन मुले आहेत. यात्रा आणि लिंगा अशी त्यांची नावे आहेत. मुलांच्या शाळेत ऐश्वर्या आणि धनुष एकत्र दिसले होते. त्यानंतर ही जोडी कधीही एकत्र दिसली नाही. आता या जोडीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा: शाहरुख, सलमान आणि आमिरही आम्हाला घाबरतात; पाकिस्तानी अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
१७ जानेवारी २०२२ रोजी धनुषने ऐश्वर्या पासून विभक्त होत असल्याची माहिती दिली होती. त्याने एक निवेदन शेअर केले होते. त्यामध्ये, 'एक मित्र म्हणून, कपल म्हणून आणि एकमेकांचे पार्टनर म्हणून आम्ही गेली १८ वर्षे एकमेकांसोबत घालवली. या प्रवासात आम्ही एकमेकांना सजमून घेतले, कठीण काळात एकमेकांना साथ दिली आणि बऱ्याच गोष्टी केल्या. आज आम्ही अशा वाटेवर उभे आहोत जिथून आमचा प्रवास वेगळा झाला आहे. मी आणि ऐश्वर्याने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे' असे म्हटले गेले होते. ऐश्वर्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील असचे निवेदन शेअर करण्यात आले होते.
वाचा: 'राजकारणात नव्या विचारसरणीची गरज आहे', सई ताम्हणकरच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय?
ऐश्वर्या आणि धनुष यांनी २००४ साली लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी ते २१ आणि २३ वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना दोन मुले झाली. एका मुलाचे नाव यात्रा असे आहे आणि दुसऱ्या मुलाचे नाव लिंगा असे आहे.
संबंधित बातम्या