मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : कोहलीची आरसीबी यंदा ट्रॉफी उचलणार! १७ वर्षांचा दुष्काळ असा संपणार? जाणून घ्या

IPL 2024 : कोहलीची आरसीबी यंदा ट्रॉफी उचलणार! १७ वर्षांचा दुष्काळ असा संपणार? जाणून घ्या

May 20, 2024 10:21 PM IST

IPL 2024 Play Offs : आरसीबीचा प्लेऑफमध्ये प्रवेश हा चमत्कारापेक्षा कमी नव्हता. पहिल्या आठ सामन्यांमध्ये केवळ एकच विजय नोंदवणाऱ्या आरसीबीने सलग ६ सामने जिंकून टॉप-४ मध्ये स्थान मिळवले आहे.

IPL 2024 : कोहलीची आरसीबी यंदा ट्रॉफी उचलणार! १७ वर्षांचा दुष्काळ असा संपणार? जाणून घ्या
IPL 2024 : कोहलीची आरसीबी यंदा ट्रॉफी उचलणार! १७ वर्षांचा दुष्काळ असा संपणार? जाणून घ्या (AFP)

आयपीएल २०२४ मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळरूची बॅकस्टोरी एखाद्या प्रेरणादायी कथेपेक्षा कमी नाही. आरसीबी एकेकाळी पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर होती आणि लीग स्टेजच्या पहिल्या ८ सामन्यांमध्ये त्यांना फक्त एक विजय मिळाला होता. 

ट्रेंडिंग न्यूज

अशा स्थितीत बेंगळुरूच्या चाहत्यांच्या सर्व आशा धुळीस मिळाल्या होत्या, पण संघातील खेळाडू पराभव स्वीकारायला तयार नव्हते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अखेरचे सलग ६ सामने जिंकून टॉप-४ मध्ये आपले स्थान पक्के केले.

यंदा आरसीबी आयपीएल जिंकणार?

चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात आरसीबीने २७ धावांनी थरारक विजय मिळवला. अशा परिस्थितीत आता आरसीबीला यंदा चॅम्पियन होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. बंगळुरू चॅम्पियन का होणार? याची कारणे आपण येथे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

पहिल्या 8 सामन्यांमध्ये फक्त एक विजय आणि लीग टप्प्याच्या अखेरीस १४ सामन्यांमध्ये ७ विजय नोंदवणे ही एक अविश्वसनीय कामगिरी आहे. बाद फेरीत प्रवेश करण्यापूर्वी फाफ डू प्लेसिसच्या सेनेला चांगली गती मिळाली आहे.

आरसीबी मानसिकदृष्ट्या खंबीर

आरसीबीचे खेळाडू सध्या मानसिकदृष्ट्या खूपच जबरदस्त लयीत आहेत. क्वालिफायर १ मध्ये त्यांचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल, राजस्थानला सलग ५ सामन्यात विजय मिळवता आला नाही. अशा परिस्थितीत, किमान क्वालिफायर १ मध्ये आरसीबी जिंकण्याची शक्यता खूप जास्त दिसते आहे. खेळाडूंची कामगिरी चांगली राहिली तर क्वालिफायर २ आणि अंतिम फेरीत संघासाठी कोणतेही लक्ष्य अशक्य दिसत नाही.

आरसीबीचे सर्वच फलंदाज लयीत

विराट कोहली लीग स्टेजच्या पहिल्या हापमध्ये नियमितपणे धावा करत होता. पण फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरॉन ग्रीनसह अनेक बलाढ्य खेळाडू मागे पडत होते. पण गेल्या ६ सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर एकीकडे कोहलीने ६५ च्या सरासरीने ३२९ धावा केल्या आहेत. डु प्लेसिसनेही गेल्या ६ डावात २ अर्धशतके झळकावून चांगली लय साधली आहे. कर्णधार डु प्लेसिसने सीएसकेविरुद्धच्या सामन्यात ५४ धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांच्याशिवाय कॅमेरून ग्रीन आणि दिनेश कार्तिक हे मधल्या फळीतील फलंदाजीतही आरसीबीला ताकद देत आहेत.

चेपॉकवर जबरदस्त रेकॉर्ड

आयपीएल २०२४ चा अंतिम सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. चेन्नईच्या या स्टेडियममध्ये आरसीबीच्या मागील ४ सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर संघ ३ वेळा विजयी झाला आहे. चिदंबरम स्टेडियमवरील शेवटच्या ४ पैकी ३ सामने जिंकणे देखील संघासाठी सकारात्मक बाब असेल. बरं, फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बेंगळुरूला एलिमिनेटर आणि त्यानंतर क्वालिफायर २ चे खडतर आव्हान पार करावे लागेल.

टी-२० वर्ल्डकप २०२४