टीआरपी यादीमध्ये पहिले स्थान पटकावणारी सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजे 'ठरलं तर मग.' या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी महत्त्वाची भूमिका वठवताना दिसत आहे. या मालिकेतून जुईने बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. आता जुईने गेल्या महिनाभरापासून आजारी असताना देखील मालिकेचे शुटिंग पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. जुईला नेमकं काय झालं? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
जुई गडकरी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतत सांगताना दिसत असते. कधी ती बाहेर फिरायला गेल्यावर फोटो शेअर करते तर कधी चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. नुकताच जुईने चाहत्यांशी संवाद साधताना तिला महिनाभरापासून बरे नसल्याचे सांगितले आहे. चला जाणून घेऊया जुईला नेमके काय झाले?
वाचा: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सई ताम्हणकरची स्वप्नपूर्ती! खरेदी केली नवी आलिशान गाडी
जुईने इन्स्टाग्रामवरील Ask Me Anythingच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी तिने चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. एका चाहतीने जुईला 'ठरलं तर मग'मध्ये तुझा आवाज वेगळा का येत आहे? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर जुईने देखील उत्तर देत तिच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. 'तो. घसा खराब झाला असून थोडा ताप येत आहे. गेल्या महिनाभरापासून ते आतापर्यंत हे सुरुच आहे' असे जुई म्हणाली आहे. तिच्या या उत्तरानंतर जुई गडकरी गेल्या महिनाभरापासून आजारी असल्याचे समोर आले आहे.
वाचा: 'स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण', गुढीपाडव्यानिमित्त माधुरी दीक्षितने शेअर केला मराठमोळा अंदाजातील व्हिडीओ
'ठरलं तर मग' मालिकेत गेल्या काही एपिसोडमध्ये जुईचा आवाज बदललेला प्रेक्षकांना जाणवत आहे. प्रेक्षकांच्याही ही बाब लक्षात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांनी जुईला सोशल मीडियावर याबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.
वाचा: अजय देवगणचा 'मैदान' चित्रपट कसा आहे? थिएटरमध्ये जाण्यापूर्वी रिव्ह्यू नक्की वाचा
काही वर्षांपूर्वी जुई गडकरी मोठ्या आजाराशी झुंज देत होती. त्यामुळे तिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. जवळपास ५ ते ६ वर्षे जुई इंडस्ट्रीपासून लांब होती. तिची स्टार प्रवाह वाहिनीवर पुढचं पाऊल ही त्यावेळी लोकप्रिय ठरलेली मालिका होती. पहिल्याच मालिकेने जुईला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. २०१७ नंतर आता जुई पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पोहोचली आहे. चाहते देखील तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असल्याचे दिसत आहे.
संबंधित बातम्या