मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘देवमाणूस’मधील किरण गायकवाड पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेत दिसणार की सिनेमा येणार?

‘देवमाणूस’मधील किरण गायकवाड पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेत दिसणार की सिनेमा येणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 10, 2024 03:05 PM IST

छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस' मालिकेतील किरण गायकवाड याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण त्याची मालिका येणार की चित्रपट हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

‘देवमाणूस’मधील किरण गायकवाड पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेत दिसणार की सिनेमा येणार?
‘देवमाणूस’मधील किरण गायकवाड पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेत दिसणार की सिनेमा येणार?

झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे 'देवमाणूस.' या मालिकेची कथा आणि पात्रांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते. त्यामधील डॉक्टर अजितची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड भलताच लोकप्रिय झाला. त्याला अनेकजण देवमाणूस म्हणून देखील आवाज देऊ लागले होते. ही मालिका संपल्यानंतर किरणला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता त्याच्या आगामी प्रोजेक्ट विषयी माहिती समोर आली असून तो मालिकेत दिसणार की चित्रपटात काम करणार आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

किरण गायवडचा एक नवा कोरा चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव 'नाद - द हार्ड लव्ह' असे असून या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टवरील किरणचा नवा लूक पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
वाचा: अजय देवगणचा 'मैदान' चित्रपट कसा आहे? थिएटरमध्ये जाण्यापूर्वी रिव्ह्यू नक्की वाचा

गुढीपाडव्याच्या मूहूर्तावर नवोन्मेषाची गुढी उभारून हिंदू नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्याची परंपरा पूर्वापार चालत आली आहे. आजही त्या परंपरेचे संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने, आनंदाने आणि आत्मीयतेने पालन केले जाते. याच दिवशी मराठी सिनेसृष्टीतही बऱ्याच नावीन्यपूर्ण गोष्टी घडत असतात. अभिनेता किरण गायकवाडचा 'नाद - द हार्ड लव्ह' या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. तसेच चित्रपटाचा फर्स्ट लूक गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधत प्रदर्शित करण्यात आले आहे.
वाचा: 'स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण', गुढीपाडव्यानिमित्त माधुरी दीक्षितने शेअर केला मराठमोळा अंदाजातील व्हिडीओ

कोणते कलाकार दिसणार?

आजवर 'मिथुन', 'रांजण', 'बलोच' अशा विविध विषयांवरील आव्हानात्मक चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे प्रकाश जनार्दन पवार हे 'नाद - द हार्ड लव्ह' चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 'देवमाणूस' या गाजलेल्या छोट्या पडद्यावरील मालिकेतील सर्वांचा आवडता अभिनेता किरण गायकवाड या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर किरणच्या जोडीला नवोदित अभिनेत्री सपना माने आणि यशराज डिंबळे हे कलाकारही आहेत.
वाचा: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सई ताम्हणकरची स्वप्नपूर्ती! खरेदी केली नवी आलिशान गाडी

काय आहे पोस्टर?

'नाद - द हार्ड लव्ह' चित्रपटाच्या पोस्टरवर किरणचा एक वेगळा लुक पाहायला मिळत आहे जो रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या जोडीला असलेल्या सपना माने आणि यशराज डिंबळे हे देखीन अनोख्या लूकमध्ये दिसत आहेत. पोस्टरवरुन ही एक प्रेमकथा असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच समाजात घडणाऱ्या घटनांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करत आहेत.

IPL_Entry_Point