बॉलिवूडमधील सध्याची अतिशय हॉट अभिनेत्री आणि एक उत्कृष्ट डान्सर म्हणून नोरा फतेहीकडे पाहिले जाते. सतत नोराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अनेकदा चाहते नोराच्या आगामी प्रोजेक्ट विषयी देखील जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. नुकताच नोराने एका मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीमधील एक कटू सत्य सांगितले आहे. 'आजकाल केवळ दिखावा आणि फायद्यासाठी कलाकार लग्न करत आहेत' असे नोरा म्हणाली आहे. तिच्या या व्यक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नोराने नुकताच रणवीर अल्लाबदियासोबत त्याच्या पॉडकास्टमध्ये गप्पा मारल्या. त्यावेळी तिने खासगी आयुष्य, बॉलिवूड इंडस्ट्री, चित्रपट, कलाकारांची एकापाठोपाठ एक होणारी लग्न यावर भाष्य केले आहे. तिने इंडस्ट्रीमध्ये सध्या कलाकार हे एकमेकांच्या प्रेमात असल्याचा दिखावा करतात. तसेच एकमेकांशी संबंधीत असल्याचे दाखवण्यासाठी देखील ते लग्न करतात. कलाकार हे खूप कॅल्क्युलेटिव्ह आहेत. ते काम आणि वैयक्तित आयुष्य एकत्र करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या मनात अनेकदा आत्महत्या करण्याच्या भावना येत असतात असे म्हटले आहे.
वाचा: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सई ताम्हणकरची स्वप्नपूर्ती! खरेदी केली नवी आलिशान गाडी
'प्रसिद्धीसाठी त्यांना केवळ तुमचे नाव वापरायचे असते. ते माझ्यासोबत असे काही करु शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही मला कधीही कोणच्या मागे फिरताना किंवा कोणाला डेट करताना पाहात नाही. पण या गोष्टी माझ्या डोळ्या समोर घडल्या आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये, एक दबदबा निर्माण व्हावा म्हणून अनेकजण लग्न करतात. अनेक लोक बायका किंवा पतीचा वापर नेटवर्किंगसाठी, पैसे कमावण्यासाठी किंवा संबंध जोडण्यासाठी करतात. त्यांना असे वाटते की एखाद्या व्यक्तीशी लग्न केले तर इंडस्ट्रीमध्ये चांगले संबंध तयार होण्यासाठी मदत होईल. कारण तिचे वर्षानुवर्षे चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि चांगली कमाई करत आहेत. या सगळ्या गोष्टींचे अनेकजण शिकार झाले आहेत' असे नोरा म्हणाली.
वाचा: 'मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही', मराठमोळ्या अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य
'ही मुले पैसा कमावण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि चर्चेत राहण्यासाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्धवस्त करतात. ज्या व्यक्तीवर तुमचे प्रेम नाही त्याच्याशी लग्न करणे हे अतिशय वाईट आहे आणि त्या व्यक्तीसोबत अनेकवर्षे राहणे... इंडस्ट्रीमधील अनेकजण असे करत आहे आणि हा खरच मूर्खपणा आहे. त्यांच्या मनात भीती असते की त्यांचे करिअर चुकीच्या मार्गाला तर जाणार नाही ना.. त्यांच्याकडे नेहमी प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी तयार असतात. मला कळत नाही तुमचे वैयक्तिक जीवन, मानसिक आरोग्य आणि आनंदाचा त्याग कसा करु शकता' असे पुढे नोरा म्हणाली.