ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर लाठीचार्ज
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर लाठीचार्ज

ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर लाठीचार्ज

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 11, 2024 06:12 PM IST

अभिनेता सलमान खान याला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी घराबाहेर तुफान गर्दी केली. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. शेवटी नाईलाजास्तव मुंबई पोलिसांनी लाठीचार्ज केला.

ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर लाढीचार्ज
ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर लाढीचार्ज

बॉलिवूडचा भाईजान म्हणजे अभिनेता सलमान खानला ईदच्या शुभेच्छा देण्याची जवळपास सर्वच चाहत्यांची इच्छा असते. काही चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून भाईजानला शुभेच्छा देतात तर काही मुंबईतील त्याच्या घराबाहेर उभे राहून शुभेच्छा देताना दिसतात. सलमान देखील चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी घराच्या बाल्कनीमध्ये येतो. पण ईदच्या मुहूर्तावर चाहत्यांनी सलमानच्या घराबाहेर तुफान गर्दी केली. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. ही गर्दी हटवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. मात्र, चाहते तेथून हटत नसल्यामुळे नाईलाजास्तव अखेर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे.

आज ११ एप्रिल रोडी ईद हा सण साजरा केला जात आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान ईदला चाहत्यांना भेटण्यासाठी बाल्कनीमध्ये येतात. पण यावेळी दोन्ही ही अभिनेते अद्याप बाहेर आलेले नाहीत. त्यामुळे सलमान खान राहात असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर चाहत्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी भर रस्त्यावर गर्दी केल्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होऊ लागले. चाहत्यांनी चाहत्यांची ही गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाहते ऐकत नसल्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.
वाचा: अजय देवगणचा 'मैदान' चित्रपट कसा आहे? थिएटरमध्ये जाण्यापूर्वी रिव्ह्यू नक्की वाचा

काय आहे व्हिडीओ?

सध्या सोशल मीडियावर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस चाहत्यांची गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही गर्दी आटोक्यात येत नसल्यामुळे पोलिलांनी लाठीचार्ज केला आहे. त्यानंतर चाहत्यांची पळापळा सुरु झाली. काही चाहते एकमेकांच्या अक्षरश: अंगावर कोसळले. त्यामध्ये एका महिलेचा समावेश असल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी पोलिसांनी गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेरील रस्ता मोकळा केल्याचे दिसत आहे.
वाचा: गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सई ताम्हणकरची स्वप्नपूर्ती! खरेदी केली नवी आलिशान गाडी

सलमान खानची ईद

दरवर्षी सलमान खान हा त्याच्या वाढदिवशी आणि ईदच्या दिवशी चाहत्यांना भेटण्यासाठी बाल्कनीमध्ये येतो. पण यंदा सलमान बाहेर आलेला नाही. त्याने नुकताच सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने 'यंदा ईदच्या दिवशी बडे मियां छोटे मियां आणि मैदान हे चित्रपट पाहा. पुढच्या ईदला सिकंदरला येईल भेटा. तुम्हा सगळ्यांना ईद मुबारक' असे म्हटले आहे.
वाचा: 'मला इंटिमेट सीन्स देताना अजिबात लाज वाटत नाही', मराठमोळ्या अभिनेत्रीचे खळबळजनक वक्तव्य

Whats_app_banner