मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय; निवडणूक प्रचारात अपमान झाल्यानं किरण माने भडकले, म्हणाले…

छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय; निवडणूक प्रचारात अपमान झाल्यानं किरण माने भडकले, म्हणाले…

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 13, 2024 12:05 PM IST

अभिनेते किरण माने हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत सामाजिक विषयांवर स्पष्ट आणि परखड मत मांडताना दिसतात. नुकताच त्यांनी केलेल्या पोस्टच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे

"छत्रपतींची गादी महाराष्ट्राच्या काळजातला विषय", गादीचा अपमान केल्याने किरण माने यांनी केली पोस्ट
"छत्रपतींची गादी महाराष्ट्राच्या काळजातला विषय", गादीचा अपमान केल्याने किरण माने यांनी केली पोस्ट

मराठमोळे अभिनेते किरण माने हे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणांनी सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. कधी राजकीय विषयांवर ते त्यांचे परखड मत मांडताना दिसतात तर कधी इंडस्ट्रीमधील मुद्द्यांवर उघडपणे बोलताना दिसतात. आता त्यांनी छत्रपतींच्या गादीचा अपमान झाल्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे. 'छत्रपतींच्या गादी विषयीचा आदर तसूभरही कमी होणार नाही' असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेकजण त्यावर कमेंट करताना दिसतात.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे किरण माने यांची पोस्ट?

"कोल्हापूर असो वा सातारा... छत्रपतींची गादी हा महाराष्ट्रातील जनतेच्या काळजातील विषय आहे. गादीला मत दिले-नाही दिले तरी, अपमानकारक विधाने करुन कधीच कोणी महामानवांशी प्रतारणा नाही केली. सातारचे आदरस्थान छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मनुवाद्यांचा रस्ता पकडला म्हणून जनतेने त्यांचा पराभव केला. पण त्यावेळीही त्या गादीचा अवमान होईल असा एकही शब्द कोणी बोलत नव्हते. आज मी स्पष्ट शब्दांत सांगू शकतो की छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना अजिबात मत देणार नाही. पण माझ्या मनातील त्यांच्या गादीविषयीचा आदर मात्र तसूभरही कमी होणार नाही. व्यक्ती वेगळी-महामानवांची गादी वेगळी. परवा कोल्हापूरात व्यक्तीला विरोध करताना घसरुन सरळसरळ त्या गादीचाच अत्यंत वाईट प्रकारे अपमान केला गेला. ही अतिशय घृणास्पद गोष्ट आहे. याहून मोठा कृतघ्नपणा कोणताच असूच शकत नाही" असे किरण माने म्हणाले.
वाचा: प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' सिनेमा? वाचा रिव्ह्यू

पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "मनुवाद्यांची घरातली कुजबूज स्वरुपातली भाषा आज लाचार बहुजनांकडून वदवून घेतली जात असल्याचे दिसत आहे. ते पहिले लक्षात घ्या. पाठीचा कणा मोडून वर्चस्ववादी सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला गेलेला प्रत्येक नेता जे बोलतोय ते त्याचे स्वत:चे तर अजिबातच मत नाही. त्याच्या नाजूक जागा पकडीत चेंबटून त्याच्याकडून ते बोलून घेतले जात आहे. वयाची ६० ते ६५ वर्षे ज्या चुलत्याच्या मार्गदर्शनाखाली वाटलाच केली, ज्या चुलत्याने मुलगा मानून मतदारसंघ आणि मोठमोठ्या पदांचा धनी बनवले, त्या चुलत्याला मी एकवेळ विरोध करेन. पण वावगं बोलण्यासाठी आपली कोणाची जीभ रेटेल का? समजा, मी रिक्षावाला होतो. ज्या घराने, कुटुंबाने मला नाव, पैसा, मानसन्मान दिला त्याच घराच्या मी एकवेळ विरोधात जाईन. पण त्या घराविषयी बोलताना मी चुकीचा एक तरी शब्द काढेन का?"
वाचा: ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर लाठीचार्ज

कोल्हापूरच्या शाहू महाराजांचा केला उल्लेख

"यांचे 'बोलविते धनी' हे वेगळे आहेत. मतदारांनो ते तुम्ही ओळखा. आपल्या महामानवांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य खर्ची घातले होते. मनुवाद्यांची सगळी कटकारस्थाने, खोट्या बदनामीचे घाव झेललेत त्यांनी. त्यांच्याशी गद्दरी मुळीच करू नका. कोल्हापूरचे शाहू छत्रपती भाजपाकडून उभे राहिले असते तर आम्ही त्यांना नक्कीच विरोध केला असता. पण या पातळीवर उतरलो मात्र नसतो. पण आपल्या सुदैवाने ते शाहू या समतेच्या विचारधारेची नाळ जपणारे आहेत. वर्चस्ववाद्यांना ठेचायला मैदानात उतरलेले दिसत आहेत. त्यांचे हात बळकट करून मातीशी इमान राखणे हे प्रत्येक कोल्हापूरकराचे कर्तव्य आहे. जय शिवराय... जय भीम!" असा उल्लेख त्यांनी केला आहे.
वाचा: 'आजकाल केवळ दिखावा आणि फायद्यासाठी कलाकार लग्न करत आहेत', नोरा फतेही हिचे खळबळजनक विधान

IPL_Entry_Point