'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत आकाश आणि वसूची कथा दाखवण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासूनचा 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता या मालिकेत एक वेगळे वळण आले आहे. मालिकेत आकाश आणि वसूच्या साखरपुड्याची लगबग सुरु आहे.
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत सध्या वेगळीच तयारी आहे. आकाश आणि वसू यांच्या आयुष्यात अनेक अडथळे आल्यानंतर आता त्यांचा साखरपुडा होणार आहे. तेव्हाच गुरुजी सांगतात दोघांच्याही पत्रिका छान जुळतायत, पण एक छोटी अडचण आहे पण एक हवन केला तर तो दोषही निघून जाईल. घरच्यांच्या मनधरणीनंतर आकाश आणि वसू दोघेही देवळात जायला तयार होतात. अवनीच्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे आकाश आणि वसु एकाच मंदिरात हवन करण्यासाठी जातात. तर दुसरीकडे माधव सांगतो की वसु आणि आकाश यांच्या साखरपुड्याचा उद्याचा मुहूर्त निघाला आहे. कारण त्यानंतर पुढचे सहा महिने एकही मुहूर्त नाही.
वाचा: प्रेक्षकांना कसा वाटला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा 'बडे मियां छोटे मियां' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
आकाश आणि वसू यांच्या दोन्ही घरात साखरपुड्याची लगबग सुरू आहे. ठाकूर कुटुंबीयांच्या घरी उत्साहाचे वातावरण आहे सगळेजण साखरपुड्यासाठी तयार होतात. आकाशला बघून सगळेजण खुश होतात. तर दुसरीकडे पिंकी वसुंधराला तयार करत असते. रानडे फॅमिलीमध्ये जवळपास सगळे खुश आहेत. पण बाजूला ठेवलेली रिंग बघून वसुंधराला तिचा भूतकाळ आठवतो. आता वसु साखरपुडा करणार का आकाशसोबत? की दुसरे काही पाऊल उचलणार? तसेच ती आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागात मिळणार आहेत.
वाचा: ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सलमान खान याच्या घराबाहेर जमलेल्या चाहत्यांवर लाठीचार्ज
झी मराठी वाहिनीवर 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेत आकाश आणि वसूची गोष्ट दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री अक्षया हिंदळकर या मालिकेत वसुंधरा रानडे हे भूमिका साकारताना दिसत आहे. तसेच अभिनेता अक्षय म्हात्रे मालिकेत आकाश ठाकूरची भूमिका वठवताना दिसत आहे. ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरताना दिसत आहे.
वाचा: 'आजकाल केवळ दिखावा आणि फायद्यासाठी कलाकार लग्न करत आहेत', नोरा फतेही हिचे खळबळजनक विधान