अली अब्बस जफर दिग्दर्शित 'बडे मियां छोटे मियां' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेता टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. प्रदर्शनापूर्वी पासूनच हा चित्रपट चर्चेत आहे. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे म्हटले जात आहे. तीन दिवसात चित्रपटाने किती कमाई केली? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगली कमाई केली होती. पहिल्या दिवशी चित्रपटाने १६ कोटी ६५ लाख रुपये कमावले होते. दुसऱ्या दिवशी मात्र चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. ही कमाई केवळ ७ कोटी ६० लाखांवर आली होती. कमाईत ५५ टक्के घसरण झाली होती. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. पण शनिवारी म्हणजेच तिसऱ्या दिवसाच्या कमाईत चांगली वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
वाचा: छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय; निवडणूक प्रचारात अपमान झाल्यानं किरण माने भडकले, म्हणाले…
'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटाच्या शनिवारच्या कमाईत वाढ झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय बॉक्स ऑफिसवर 'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटाने शनिवारी ८ कोटी ५० लाख रुपये कमावले आहेत. ट्रेंड विश्लेषक यांच्या मते येत्या काळात चित्रपट ९ ते १० कोटी रुपयांची कमाई करु शकतो. पण याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. तीन दिवसात चित्रपटाने ३१ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई केली आहे.
वाचा: वसु आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका वेगळ्या वळणावर
'बडे मियां छोटे मियां' हा अक्षय आणि टायगर श्रॉफचा अॅक्शन चित्रपट आहे. या चित्रपटात भारतीय सैन्यातील दोन जवान जे चोरले गेलेले हत्यार शोधण्याचा प्रयत्न करत असतात हे दाखवण्यात आले आहे. त्यांची ही लढाई एका दहशतवाद्याशी असते जो देशाला उद्भवस्त करण्याचा प्रयत्न करत असतो. ३७० कोटी रुपये बजेट असणाऱ्या चित्रपटाची कमाई फारशी दिसत नाही. पण IMDbने चित्रपटाला चांगले रेटिंग दिले आहे. ८.२ असे रेंटिंग देण्यात आले आहे.
वाचा: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरने पत्र लिहून मागितली मुक्ताची माफी, काय असेल आता तिचे पुढचे पाऊल? वाचा