बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून धमक्यांचे मेसेज, इमेल येत असल्याचे दिसत आहे. आज पहाटे सलमानच्या घरावर थेट गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात सलमानच्या घरात एक गोळी शिरली आणि बाकी घराच्या भींतीवर गोळ्या झाडण्यात आल्या. आता या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सलमानच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फूटेज समोर आला आहे.
रविवारी पहाटे पाचच्या सुमारास बॉलिवूडचा भाईजान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी या घरावार गोळीबार करण्यात आला. दोन अज्ञात व्यक्ती बाईकवरुन येतात आणि गोळीबार करुन पळून जातात. आता या प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटसाठी काम करत असलेल्या चार वॉचमनचे जबाब नोंदवले आहेत.
वाचा: 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत सागरने पत्र लिहून मागितली मुक्ताची माफी, काय असेल आता तिचे पुढचे पाऊल? वाचा
सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचे प्रकरण हे एटीएसकडे देण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, या गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना मागील काही काळात बिश्नोई गँगकडून धमक्या येत होत्या. पत्र आणि ईमेलद्वारे सतत धमकी देण्यात आली होती. त्यामुळे आता झालेल्या गोळीबाराचे संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडला जात असल्याचे दिसत आहे.
वाचा: छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय; निवडणूक प्रचारात अपमान झाल्यानं किरण माने भडकले, म्हणाले…
पहाटेच्या वेळी सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीने आपले संपूर्ण शरीर हे झाकले असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की दोन जण दुचाकीवरून येतात, फायरिंग करतात आणि तेथून निघून जातात. पण या दोन व्यक्ती कोण आहेत? असा प्रश्न अद्याप सर्वांसमोर आहे.
वाचा: वसु आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिका वेगळ्या वळणावर
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टेंमधील घरावर गोळी बार करण्यात आला. एकूण पाच गोळ्या सलमानच्या घरावर झाडण्यात आल्या होत्या. चार गोळ्या या घराच्या भींतीवर लागल्या. त्यानंतर एक गोळी गॅलरीतील पडद्यावरून आरपार आतमध्ये गेली. सुदैवाने पहाटेची वेळ असल्यामुळे गॅलरीमध्ये कोणीही नव्हते. एक गोळी गॅलरीच्या पडद्यातून आरपार गेली आणि एक गोळी भिंतीवर लागली आहे. तर तीन पुंगळ्या रस्त्यावर सापडल्या आहेत.