मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  घरावर गोळीबार झाला तेव्हा अभिनेता सलमान खान नेमका कुठे होता? मोठी अपडेट आली समोर

घरावर गोळीबार झाला तेव्हा अभिनेता सलमान खान नेमका कुठे होता? मोठी अपडेट आली समोर

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 15, 2024 08:10 AM IST

रविवारी पहाटे अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार करण्यात आला. जेव्हा गोळीबार झाला तेव्हा सलमान खान कुठे होता? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. आता याबाबत माहिती समोर आली आहे.

घरावर गोळीबार झाला तेव्हा अभिनेता सलमान खान नेमका कुठे होता? मोठी अपडेट आली समोर (Photo by Sujit JAISWAL / AFP)
घरावर गोळीबार झाला तेव्हा अभिनेता सलमान खान नेमका कुठे होता? मोठी अपडेट आली समोर (Photo by Sujit JAISWAL / AFP) (AFP)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. त्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे. सुरूवातीला हा गोळीबार हवेत करण्यात आल्याचे म्हटले गेले. मात्र, त्यानंतर हा गोळीबार सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर करण्यात आल्याची माहिती समोर आली. या गोळीबारात एक गोळी सलमान खानच्या घरात देखील शिरली होती. त्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. पण जेव्हा गोळीबार झाला तेव्हा सलमान खान नेमका कुठे होता? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

घरात घुसली गोळी

रविवारी पहाटे पाचच्या सुमारास सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी या घरावार गोळीबार करण्यात आला. दोन अज्ञात व्यक्ती पहाटे ४ वाजून ५५ मिटांनी बाईकवरुन येतात आणि गोळीबार करुन पळून जातात. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटसाठी काम करत असलेल्या चार वॉचमनचे जबाब नोंदवले आहेत. झालेल्या गोळीबारात एक गोळी सलमानच्या घराच्या भींतीला लागली आणि एक गोळी ही थेट सलमान खानच्या बाल्कनीमधून घरात शिरली आहे. सुदैवाने पहाटेची वेळ असल्यामुळे गॅलरीमध्ये कोणीच नव्हते. त्यामुळे पडद्याच्या आरपार गेलेली गोळी कोणालाही लागली नाही. या गोळीबारातील तीन पुंगळ्या रस्त्यावर सापडल्या आहेत.
वाचा: सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज आलं समोर, आरोपी दुचाकीवरून आला अन्...

सलमान खान कुठे होता?

गोळीबार झाला त्यावेळी सलमान खान हा नेमका कुठे होता? असा प्रश्न सतत चाहत्यांच्या मनात येत आहे. यावर पोलिसांकडून हे स्पष्ट करण्यात आले की, ज्यावेळी गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. तो आपल्या संपूर्ण कुटुंबियांसोबत असल्याची माहिती समोर आली आहे.
वाचा: 'तारक मेहता..' मालिकेतील सोनूचा एअरपोर्टवर अतरंगी कारनामा, काही सेकंदामध्येच तयार केला टॉप

गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर

पहाटेच्या वेळी सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीने आपले संपूर्ण शरीर हे काळ्या कपड्यांनी झाकले असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की दोन जण दुचाकीवरून येतात, फायरिंग करतात आणि तेथून पळ काढतात. आता या दोन व्यक्तींची ओळख पटली आहे.

गोळीबार प्रकरण एटीएसकडे

सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचे प्रकरण हे सध्या एटीएसकडे देण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने दिलेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, या गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचा हात आहे. सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना मागील काही काळात बिश्नोई गँगकडून धमक्यांचे पत्र आणि ईमे येत होते.

IPL_Entry_Point