अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'या' मराठी सिनेमात करणार काम
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'या' मराठी सिनेमात करणार काम

अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'या' मराठी सिनेमात करणार काम

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 16, 2024 08:30 AM IST

जवळपास ३०-३५ वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेली 'रामायण' ही मालिका प्रचंड गाजली. विशेषतः राम-सीतेची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरली होती. अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया यांनी या भूमिका साकारल्या होत्या. आता ही जोडी मराठी सिनेमात काम करणार आहे

अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'या' मराठी सिनेमात करणार काम
अरुण गोविल आणि दीपिका चिखलीया रुपेरी पडद्यावर, राम-सीतेची लोकप्रिय जोडी 'या' मराठी सिनेमात करणार काम

८०च्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित झालेली 'रामयण' ही मालिका अतिशय हिट ठरली होती. ३०-३५ वर्षांनंतरही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. विशेषतः मालिकेत राम आणि सीतेच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः आपल्या हृदयात स्थान दिले. या मालिकेच्या माध्यमातून प्रभू श्री रामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी त्याकाळी प्रत्येक घराघरांत-मनामनांत ‘राम-सीता’ म्हणूनच विशेष जागा पटकावली. या राम-सीतेच्या जोडीची अफाट लोकप्रियता आजही कायम कायम आहे. आता त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे. अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया ही जोडी एका मराठी चित्रपटात दिसणार आहे.

अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया मुख्य भूमिकेत असणारा ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महत्त्वाकांक्षी चित्रपटातून ही जोडी आत्ता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. या चित्रपटात ही जोडी नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, दोघांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे.
वाचा: सायली नेमकी कोणती? ओळखा पाहू व्हायरल झालेल्या फोटोमधील अभिनेत्री जुई गडकरी नेमकी कोणती?

काय आहे चित्रपटाची कथा?

पुरंदरच्या लढाईत ‘न भूतो न भविष्यती’ असा पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा दाखवण्यात येणार आबे. भव्यदिव्य स्वरूपात रुपेरी पडद्यावर मांडणारा ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ हा चित्रपट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आजच्या पिढीला आपल्या स्वराज्याचा प्रेरणादायी इतिहास कळायला हवा तसेच बघता यावा यासाठी ही चित्ररूपी चळवळ उभारण्यात आली आहे.
वाचा: 'हे सगळं नाटक आहे', सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारावर अभिनेत्याची प्रतिक्रिया

कोणते कलाकार दिसणार?

‘वीर मुरारबाजी’ या चित्रपटात शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन दिसणार आहे. तसेच अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया हे कलाकार कोणती भूमिका साकारणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उच्च निर्मितीमूल्य, दर्जेदार तंत्र आणि त्याला असलेली उत्तोमोत्तम कलाकारांची जोड यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढली आहे. भाऊसाहेब आरेकर यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय-अनिरुद्ध यांनी केले आहे.
वाचा: घरावर गोळीबार झाला तेव्हा अभिनेता सलमान खान नेमका कुठे होता? मोठी अपडेट आली समोर

Whats_app_banner