बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून लारा दत्ता ओळखली जाते. आज १६ एप्रिल रोजी लारा ४६वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या लारा दत्ता बॉलिवूडमध्ये फारशी सक्रिय नसली, तरी एकेकाळी तिने एकामागून एक सुपरहिट ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. कोणताही गॉडफॉदर नसताना देखील लारा दत्ताने बॉलिवूडमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे. वयाच्या ४६व्या वर्षी आजही ती खूप फिट आहे. लारा दत्तने केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात आपले नाव कमावले आहे. २००० साली लारा दत्तने मिस युनिव्हर्सचा ताज पटकावला आणि तेव्हापासून आजतागायत ती नेहमीच चर्चेत असते. त्यावेळी लाराला कोणता प्रश्न विचारण्यात आला होता चला जाणून घेऊया..
लारा दत्ताचा जन्म १६ एप्रिल १९७८ रोजी दिल्लीमधील गाझियाबाद येथे झाला. तिचे वडील एलके दत्ता हवाई दलामध्ये अधिकारी होते. लाराचे वडील हे पंजाबी आहेत. तर आई अँग्लो इंडियन्स पैकी एक आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी लाराने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या होत्या. साल २००० मध्ये मिस युनिव्हर्स ताज जिंकत लाराच्या आयुष्याला कलाटणी मिळाणी. तिच्या या विजेतेपदामागील कथाही खूपच रंजक आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी अंतिम फेरीत प्रत्येक स्पर्धकाला प्रश्न विचारण्यात आला होता आणि स्पर्धकांच्या उत्तरांच्या आधारे विजेत्याचा निर्णय घ्यायचा होता. असाच एक प्रश्न लारा दत्ताला देखील विचारण्यात आला होता, ज्याचे तिने इतक्या सुंदर पद्धतीने उत्तर दिले की तिला स्पर्धेची थेट विजेती घोषित करण्यात आले.
वाचा: सायली नेमकी कोणती? ओळखा पाहू व्हायरल झालेल्या फोटोमधील अभिनेत्री जुई गडकरी नेमकी कोणती?
लाराला प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘मिस युनिव्हर्स स्पर्धेला बाहेरुन विरोध करण्यात येत आहे. लोकांच्या मते स्पर्धेत महिलांचा अपमान केला जात आहे. पण ते चुकीचे आहेत हे तुम्ही विरोधकांना कशा प्रकारे पटवून द्याल.” या प्रश्नावर उत्तर देताना लारा म्हणाली की, "मला वाटते की अशा स्पर्धांमुळे आमच्यासारख्या तरुण महिलांना आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्याची मोठी संधी मिळते. मग तो व्यवसाय, सशस्त्र दल किंवा राजकारणात असोत." लाराचे हे उत्तर तिथे उपस्थित असलेले परिक्षक भारावून गेले. अन् लारा मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती बनली.
वाचा: 'हे सगळं नाटक आहे', सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबारावर अभिनेत्याची प्रतिक्रिया
‘नो एंट्री’, पार्टनर’, ‘मस्ती’, ‘भागम भाग’, ‘हाऊसफुल’, ‘चलो दिल्ली’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये लारा दत्ता दिसली होती. तिने २००३ मध्ये अक्षय कुमारसोबत अंदाज या चित्रपटाद्वारे अभिनयाच्या दुनियेत पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरला. तसेच, यासाठी लाराला सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्री पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
वाचा: घरावर गोळीबार झाला तेव्हा अभिनेता सलमान खान नेमका कुठे होता? मोठी अपडेट आली समोर