मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सायली नेमकी कोणती? ओळखा पाहू व्हायरल झालेल्या फोटोमधील अभिनेत्री जुई गडकरी नेमकी कोणती?

सायली नेमकी कोणती? ओळखा पाहू व्हायरल झालेल्या फोटोमधील अभिनेत्री जुई गडकरी नेमकी कोणती?

Aarti Vilas Borade HT Marathi
Apr 15, 2024 11:32 AM IST

अभिनेत्री जुई गडकरी हिने बालपणीचा भावंडांसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि ओळखा पाहू असे कॅप्शन दिले आहे. सोबतच तिने चाहत्यांना एक हिंट देखील दिली आहे.

सायली नेमकी कोणती? ओळखा पाहू व्हायरल झालेल्या फोटोमधील अभिनेत्री जुई गडकरी नेमकी कोणती?
सायली नेमकी कोणती? ओळखा पाहू व्हायरल झालेल्या फोटोमधील अभिनेत्री जुई गडकरी नेमकी कोणती?

'ठरलं तर मग' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जुई गडकरी सध्या चर्चेत आहे. जवळपास ५ ते ६ वर्षानंतर जुईने या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले. या मालिकेतील तिचे सायली हे पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता सध्या जुई एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. या चर्चा जुईने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जुईला ओळखणे देखील कठीण झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

जुई ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती तिच्या खासगी आयुष्याविषयी तसेच आगामी प्रोजेक्टविषयी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती देत असते. चाहते देखील जुई विषयी जाणून घेण्यासाठी कायमच उत्सुक असतात. नुकताच जुईने बालपणीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जुईसोबत तिचे बहिण-भाऊ उभे असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत जुईने 'ओळखा पाहू?' असे कॅप्शन दिले आहे.
वाचा: सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज आलं समोर, आरोपी दुचाकीवरून आला अन्...

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट

जुईने सोशल मीडियावर हा फोटो शेअर करताच तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका यूजरने 'सगळ्यात लहान ब्ल्यू कलर वाली बरोबर ना' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घालून स्टूलवर बसलेली' अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने 'सायली कुठं आहे बरं अर्जून ची लाडकी' असे म्हटले आहे. जुईच्या या फोटोवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: 'तारक मेहता..' मालिकेतील सोनूचा एअरपोर्टवर अतरंगी कारनामा, काही सेकंदामध्येच तयार केला टॉप

जुई नेमकी कोणती?

जुईने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या तीन बहिणी आणि एक भाऊ दिसत आहे. त्यामध्ये जुईचा भाऊ तुषार गडकरी, लिना वैद्य, संपदा आणि प्राची दिसत आहे. फोटो शेअर करत जुईने हॅशटॅगचा वापर करत चाहत्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. जुईने नारळाचं झाडं असा एक हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातलेली स्टूलवर बसलेली चिमुकली जुई आहे. तिने नारळाच्या झाडा प्रमाणे केसाचा पोनी बांधनला आहे.
वाचा: बॉक्स ऑफिसवर 'बडे मियां छोटे मियां' सिनेमाचा धुमाकूळ, तीन दिवसातच कमावले इतके कोटी

IPL_Entry_Point