IPL 2024: सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२४ मधील ५० वा सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत राजस्थानच्या संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. राजस्थानने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या नऊ पैकी ८ सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान संघाने आपल्या शेवटच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा ७ विकेटने पराभव केला होता. दुसरीकडे, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबाद संघाला त्यांच्या गेल्या सामन्यात सीएसकेकडून ७८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आता आयपीएल २०२४ च्या ५० व्या सामन्यात हैदराबादचा संघ राजस्थानशी भिडणार आहे. अशा परिस्थितीत, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना कधी, कुठे आणि कसा थेट पाहता येईल? हे जाणून घेऊयात.
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज (०२ एप्रिल २०२४) आयपीएलमधील ५० वा सामना खेळला जाईल. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकिपर, कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, टॉम कोहलर-कॅडमोर, शुभम दुबे, तनुष कोटियन, नवदीप सैनी, केशव महाराज, नांद्रे बर्गर, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक, कुणाल सिंग राठौर
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, मयंक मार्कंडे, राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंह.
संबंधित बातम्या