T20 World Cup 2024 : भारत उपांत्य फेरीतही पोहोचणार नाही... दिग्गज क्रिकेटपटूनं केली भविष्यवाणी, वाचा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 : भारत उपांत्य फेरीतही पोहोचणार नाही... दिग्गज क्रिकेटपटूनं केली भविष्यवाणी, वाचा

T20 World Cup 2024 : भारत उपांत्य फेरीतही पोहोचणार नाही... दिग्गज क्रिकेटपटूनं केली भविष्यवाणी, वाचा

May 01, 2024 03:21 PM IST

T20 World Cup 2024 Prediction : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने (vaughan Made Prediction T20 World Cup 2024) २०२४ टी-20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच उपांत्य फेरीचे ४ संघ निवडले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाचा समावेश नाही.

T20 World Cup 2024 Prediction भारत उपांत्य फेरीतही पोहोचणार नाही... दिग्गज क्रिकेटपटूनं केली भविष्यवाणी, वाचा
T20 World Cup 2024 Prediction भारत उपांत्य फेरीतही पोहोचणार नाही... दिग्गज क्रिकेटपटूनं केली भविष्यवाणी, वाचा (PTI)

T20 World Cup 2024 Semi-finalist Prediction : टी-20 विश्वचषक २०२४ हळूहळू जवळ येत आहे. टीम इंडियाने या स्पर्धेसाठी आपला संघही जाहीर केला आहे. भारतासोबतच आता ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेनेही विश्वचषकासाठी संघ घोषित केले आहेत.

यानंतर आता विश्वचषकापूर्वी क्रिकेट तज्ज्ञ आणि माजी दिग्गजांनी विविध अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे, अशातच आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने आगामी वर्ल्डमकपमध्ये सेमी फायनलमध्ये पोहोचणारे ४ संघ कोणते असतील याबाबत भविष्यवाणी केली आहे.

विशेष म्हणजे, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने दुसऱ्याच दिवशी या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या ४ संघांची भविष्यवाणी केली. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे, या यादीत टीम इंडियाचे नाव नाही.

मायकेल वॉनने आपल्या भविष्यवाणीत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हे संघ सेमी फायनल खेळतील असा अंदाज बांधला आहे.

इंग्लंड २०२२ टी-20 वर्ल्डकपचा विश्वविजेता आहे आणि त्यांनी २०१० मध्येही ट्रॉफी जिंकली होती. तर दक्षिण आफ्रिका पहिल्या विजेतेपदाची वाट पाहत आहे. ऑस्ट्रेलियाने २०२१ चे विजेतेपद जिंकले होते तर वेस्ट इंडिज देखील दोन वेळा चॅम्पियन आहे.

मायकल वॉनच्या या पोस्टमुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. तसेच, यावर अतिशय जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे त्याने पाकिस्तानलाही टॉप-४ मध्ये ठेवलेले नाही. अशाप्रकारे, दोन मोठ्या आशियाई संघांना वगळून त्याने चाहत्यांच्या मोठ्या गटाला आपल्या विरोधात केले आहे.

दरम्यान, मायकल वॉनच्या पोस्टवर, अनेक कमेंट्स आल्या आहेत. “रोहित शर्माची टीम येईल आणि ट्रॉफी जिंकेल,” अशी कमेंट एका यूजरने केली आहे.

तसेच, काही चाहते आहेत जे मायकेल वॉनशी सहमत आहेत आणि भारतीय संघाची निवड योग्य झाली नाही असे मानतात. काहींनी रिंकू सिंगला मुख्य संघात न घेतल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

टी-20 विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

टी-20 विश्वचषक २०२४ साठी राखीव खेळाडू

शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद

Whats_app_banner