इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या ४९ व्या सामन्यात आज (१ मे) चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने होते. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिमवर पंजाब किंग्सचा कर्णधार सॅम करनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
यानंतर सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाबने १७.५. षटकात १६३ धावा करत सामना जिंकला.
महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईने आतापर्यंत १० पैकी ५ सामने जिंकले आहेत. या पराभवानंतर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील CSK संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जने १० पैकी ४ सामने जिंकले आहेत. या चौथ्या विजयासह हा संघ आता ८व्या वरून ७व्या स्थानावर पोहोचला आहे.
तत्पूर्वी, १६३ धावांचा पाठलाग करताना पंजाब संघाने पहिली विकेट १९ धावांवर गमावली होती. त्यानंतर जॉनी बेअरस्टोने ३० चेंडूत ४६ धावांची तर रिले रोसोने २३ चेंडूत ४३ धावांची खेळी खेळली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूत ६४ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ नेले.
शेवटी शशांक सिंग २५ धावांवर नाबाद तर सॅम करन २६ धावांवर नाबाद माघारी परतला. दोघांनी संघाला विजय मिळवून दिला.
चेन्नईकडून शार्दुल ठाकूर, रिचर्ड गिल्सन आणि शिवम दुबे यांनी १-१ बळी घेतला.
सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पॉवरप्लेमध्ये बिनबाद ५५ धावा केल्या होत्या. पण अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर अचानक सीएसकेचा डाव गगडला.
यानंतर चेन्नईला ८ ते १५ षटकांमध्ये एकही चौकार मारता आला नाही. ६ षटकांत संघाची धावसंख्या बिनबाद ५५ धावा होती. पण तीच धावसंख्या १६ षटकांत ११० पर्यंतच जाऊ शकली.
चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४८ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि २ षटकार आले. शेवटी महेंद्रसिंह धोनीने ११ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १४ धावा केल्या. या मोसमात तो पहिल्यांदाच बाहेर बाद झाला आहे. तो २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावबादझा ला.
संबंधित बातम्या