मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sanju Samson : संजू सॅमसन संघात आहे तर भारत टी-20 वर्ल्ड कप जिंकणार! काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

Sanju Samson : संजू सॅमसन संघात आहे तर भारत टी-20 वर्ल्ड कप जिंकणार! काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 01, 2024 09:10 PM IST

shashi tharoor on sanju samson : टी-20 वर्ल्डकपच्या १५ सदस्यीय संघात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनचाही समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसनने २०१५ मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. पण त्यानंतर अनेक क्रिकेट विश्वचषक झाले, पण संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली नाही.

shashi tharoor on sanju samson : संजू सॅमसन संघात आहे तर भारत टी-20 वर्ल्ड कप जिंकणार! काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य
shashi tharoor on sanju samson : संजू सॅमसन संघात आहे तर भारत टी-20 वर्ल्ड कप जिंकणार! काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य (PTI)

sanju samson in t20 world cup 2024 squad : आगामी टी-20 वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघही जाहीर झाला आहे. बीसीसीआयने एकूण १५ खेळाडूंची निवड केली आहे. एवढेच नाही तर ४ खेळाडू राखीव म्हणून संघासोबत जाणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

टी-20 वर्ल्डकपच्या १५ सदस्यीय संघात विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसनचाही समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसनने २०१५ मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. पण त्यानंतर अनेक क्रिकेट विश्वचषक झाले, पण संजू सॅमसनला खेळण्याची संधी मिळाली नाही.

विशेष म्हणजे जेव्हा टी-20 विश्वचषक येतो, तेव्हा संजूला एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी दिली जात होती आणि जेव्हा एकदिवसीय विश्वचषक जवळ येतो तेव्हा त्याला टी-20 संघात टाकले जात होते. त्यामुळे त्याचे चाहते नेहमीच बीसीसीआयवर संताप व्यक्त करायचे.

पण आता अखेर संजूची टी-20 वर्ल्डकपसाठी निवड झाली आहे. वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये संजूची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान, संजूच्या निवडीवर काँग्रेसच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. संजू सॅमसन असेल तर भारतीय संघ यावेळी निश्चितपणे टी-20 विश्वचषक जिंकेल, असे या नेत्याचे म्हणणे आहे. या नेत्याचे नाव शशी थरूर आहे.

शशी थरूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली

संजू सॅमसनची भारतीय संघात निवड झाल्याने चाहते खूप खूश आहेत. तो यष्टिरक्षकाची भूमिका साकारणार आहे. मात्र, प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याची निवड होणार की नाही याबाबत सस्पेंस आहे.

पण आता काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे की, केरळमधील त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील तिरुवनंतपुरममधील हा यष्टिरक्षक फलंदाज निवडीस पात्र होता. शशी थरूर यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, टी-20 विश्वचषकासाठी उत्कृष्ट संघ निवडल्याबद्दल बीसीसीआयच्या निवड समितीचे अभिनंदन. संजू सॅमसनची संघात निवड झाल्यामुळे माझ्या लोकसभा मतदारसंघाचे क्रिकेट विश्वचषकात प्रतिनिधित्व होणार याचा आनंद आहे. हा संघ विजेतेपद पटकावणार आहे."

दरम्यान, तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी जेव्हा भारतात एकदिवसीय विश्वचषक खेळला गेला, तेव्हा संजू सॅमसन संघात नव्हता आणि शशी थरूर यांनी त्यावर बरीच टीका केली होती.

संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार

संजू सॅमसन सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करत आहे. त्याचा संघ प्लेऑफच्या अगदी जवळ आहे. संजूने कर्णधार म्हणून आपली क्षमता सिद्ध केली आहे आणि तो शानदार फलंदाजीही करत आहे. त्यामुळेच संघनिवडीची जेव्हापासून चर्चा सुरू होती, तेव्हापासून अनेक जण त्याच्या निवडीची मागणी करत होते, पण तरीही संघ निवडीची प्रतीक्षा होती. आता त्याची निवड झाल्याने त्याचा आत्मविश्वासही खूप वाढणार आहे. मात्र विश्वचषकात तो कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे.

संजू सॅमसनची T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्द

संजू सॅमसनच्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, २०१५ मध्ये त्याने पदार्पण केले. पण त्याला सतत खेळण्याची संधी मिळाली नाही. तो आतापर्यंत केवळ २५ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकला आहे.

यामध्ये त्याच्या नावावर ३७४ धावा आहेत. त्याची सरासरी १८.७० आहे आणि तो १३३.०९ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत आहे. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर फक्त एकच अर्धशतक आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने एकही शतक झळकावले नाही, पण एकदिवसीय सामन्यात त्याच्या नावावर शतक आहे.

IPL_Entry_Point