मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK vs PBKS Dream 11 Prediction : आज सीएसके-पंजाब भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

CSK vs PBKS Dream 11 Prediction : आज सीएसके-पंजाब भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 01, 2024 01:30 PM IST

CSK vs PBKS Dream 11 Prediction : आयपीएलमध्ये आज सीएसके आणि पंजाब भिडणार आहेत. हा सामना चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.

CSK vs PBKS Dream 11 Prediction : आज सीएसके-पंजाब भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम
CSK vs PBKS Dream 11 Prediction : आज सीएसके-पंजाब भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

आयपीएल २०२४ चा ४९ वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर आज (१ मे) सायंकाळी ७:३० आमनेसामने येतील.

ट्रेंडिंग न्यूज

चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर ७८ धावांनी विजय मिळवला होता, मात्र त्याआधी त्यांना २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. सीएसके १० गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

तर पंजाब किंग्ज अतिशय वाईट स्थितीत आहे. पण त्यांनी त्यांच्या याआधीच्या सामन्यात केकेआरविरुद्ध विक्रमी २६२ धावांचे लक्ष्य गाठले होते. अशा परिस्थिती हा सामना चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, सीएसके असो की पंजाब, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

विकेटकीपर

चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यातील या सामन्यात तुमच्या ड्रीम इलेव्हनमध्ये तुम्ही जॉनी बेअरस्टोला यष्टीरक्षक म्हणून तुमच्या संघाचा भाग बनवू शकता. केकेआरविरुद्धच्या सामन्यात बेअरस्टोने शतक केले होते. 

यानंतर, तुम्ही तुमच्या संघात प्रमुख फलंदाज म्हणून ५ खेळाडूंचा समावेश करू शकता. सीएसके संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडची बॅट गेल्या काही सामन्यांमध्ये जोरदार बोलताना दिसत आहे.

फलंदाज

गायकवाडचे हैदराबादविरुद्ध शतक हुकले पण संघाची धावसंख्या २०० च्या पुढे नेण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय तुम्ही तुमच्या संघात शिव दुबे, डॅरिल मिशेल, शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांचाही समावेश करू शकता, या सर्वांनी आतापर्यंतच्या हंगामात उत्कृष्ट फॉर्म दाखवला आहे.

ऑलराऊंडर

या सामन्यासाठी तुम्ही तुमच्या ड्रीम ११ संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून रवींद्र जडेजा, मोईन अली आणि सॅम करन यांचा समावेश करू शकता. 

गायकवाड कर्णधार, जडेजा उपकर्णधार 

या सामन्याच्या ड्रीम इलेव्हन संघासाठी तुम्ही कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडची निवड करू शकता. त्याने या मोसमात आतापर्यंत ९ सामन्यांमध्ये ६३.८६ च्या सरासरीने ४४७ धावा केल्या आहेत आणि ऑरेंज कॅप शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय, तुम्ही रवींद्र जडेजाला उपकर्णधार म्हणून निवडू शकता, कारण जडेजाने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध बॉल आणि बॅट दोन्हीसह चांगली कामगिरी केली आहे.

CSK vs PBKS  Dream 11 Prediction

यष्टिरक्षक – जॉनी बेअरस्टो.

फलंदाज - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), शिवम दुबे, डॅरिल मिशेल, शशांक सिंग, आशुतोष शर्मा.

अष्टपैलू - रवींद्र जडेजा (उपकर्णधार), सॅम करन, मोईन अली.

गोलंदाज - मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे.

IPL_Entry_Point