IPL 2024: आयपीएल २०२४ मधील प्लेऑफ आणि फायनल सामन्यात जोस बटलर, फिल सॉल्ट यांच्यासह इंग्लंडचे खेळाडू त्यांच्या संघाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाहीत. इंग्लंडचे खेळाडू संध्या आयपीएल खेळत आहेत. इंग्लंडने मंगळवारी टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये आयपीएलमध्ये खेळणाऱ्या काही खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने त्यांच्या खेळाडूंना बाद फेरीच्या सामन्यांसाठी अनुपलब्ध केले.
टी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात येत्या २२ मे पासून चार सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ईसीबीच्या या निर्णयामुळे जोस बटलर, फिल सॉल्ट आणि मोईन अली यांना परतावे लागणार आहे. बटलर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, सॉल्ट कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि मोईन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळतो. कोलकाता, राजस्थान आणि चेन्नई सुपरकिंग्ज हे सर्व प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. मात्र, जोस बटलर, फिल सॉल्ट आणि मोईन अली यांची अनुउपस्थिती त्यांच्यासाठी उडचणीचे ठरू शकते.
इंग्लंडच्या पुरुष संघाचे व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांना निवडीबाबत माहिती दिली. हे खेळाडू बाद फेरीसाठी उपलब्ध नसल्याचीही त्यांना माहिती देण्यात आली. आयपीएल २०२४ च्या प्लेऑफचे सामने २१ ते २६ मे दरम्यान होतील. बटलर, सॉल्ट आणि मोईन यांच्या व्यतिरिक्त इंग्लंडच्या विश्वचषक संघात जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिव्हिंगस्टोन, विल जॅक आणि रीस टोप्ले यांचाही समावेश आहे आणि हे खेळाडू देखील आयपीएलचा भाग आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडचे सर्व खेळाडू १८-१९ मे पर्यंत मायदेशी परततील, असे झाल्यास इंग्लंडचा एकही खेळाडू प्लेऑफसाठी उपलब्ध होणार नाही. आयपीएलचा ग्रुप स्टेज १९ मेपर्यंत सुरू राहणार आहे. मंगळवारी संघ जाहीर झाल्यानंतर रॉब म्हणाले की, तुम्ही कोणत्याही कारणाशिवाय खेळाडूंना परत बोलावू शकत नाही. याचे एक कारण म्हणजे खेळाडूंची सुरक्षा. बटलरने आयपीएल संपण्यापूर्वीच मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. बटलरला सांगण्यात आले की, त्याला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत संघाचे नेतृत्त्व करायचे आहे आणि टी-२० विश्वचषकाची तयारी करायची आहे.
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोप्ले आणि मार्क वूड.
संबंधित बातम्या