मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 : सीएसके यंदा चॅम्पियन बनणार नाही याची ३ कारणं... चेपॉकवर निवृत्त होण्याची धोनीची इच्छा अपूर्ण राहणार?

IPL 2024 : सीएसके यंदा चॅम्पियन बनणार नाही याची ३ कारणं... चेपॉकवर निवृत्त होण्याची धोनीची इच्छा अपूर्ण राहणार?

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 28, 2024 10:25 PM IST

CSK In IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. संघाने ८ पैकी केवळ ४ सामने जिंकले आहेत आणि ४ गमावले आहेत.

IPL 2024 : सीएसके यंदा चॅम्पियन बनणार नाही याची ३ कारणं... चेपॉकवर निवृत्त होण्याची धोनीची इच्छा अपूर्ण राहणार?
IPL 2024 : सीएसके यंदा चॅम्पियन बनणार नाही याची ३ कारणं... चेपॉकवर निवृत्त होण्याची धोनीची इच्छा अपूर्ण राहणार? (CSK-X)

IPL 2024 Chennai Super Kings : आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जला आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. सीएसकेकडून आतापर्यंत तरी फक्त सरासरी कामगिरी दिसून आली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नईने या मोसमात आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत, ज्यात ४ जिंकले आहेत तर ४ मध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

सीएसके टॉप-४ मधूनही बाहेर पडला आहे. चेन्नई गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.

दरम्यान, या मोसमात चेन्नई सुपर किंग्स ट्रॉफी जिंकू शकेल अशी शक्यता फारच कमी मानली जात आहे. याचीच कारणं येथे आपण येथे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

विशेष म्हणजे एम एस धोनीचा हा शेवटचा आयपीएल असल्याचेही बोलले जात आहे. जर हे खरे असेल तर धोनीला रिकाम्या हाताने निवृत्त व्हावे लागू शकते.  

१) नवखा कर्णधार

महेंद्रसिंह धोनी मागील हंगामात म्हणजेच आयपीएल २०२३ पर्यंत चेन्नईचे नेतृत्व करत होता. गेल्या मोसमात त्याने आपल्या नेतृत्वाखाली संघाला ट्रॉफी जिंकून दिली होती. पण या सीझनला म्हणजेच आयपीएल २०२४ च्या सुरुवातीपूर्वी धोनीने कर्णधारपद सोडले आणि युवा ऋतुराज गायकवाडला कर्णधार बनवण्यात आले.

अशा स्थितीत युवा गायकवाडवर कर्णधारपदाचे दडपण आहे, या दडपणात त्याच्या चुकाही होत आहेत.  

२) सीएसके शिवम दुबेवर खूप अवलंबून

अष्टपैलू शिवम दुबेने आतापर्यंत चेन्नईसाठी उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. शिवमने अनेक प्रसंगी शानदार खेळी खेळली आणि संघाला चांगली धावसंख्या उभारण्यात आणि गाठण्यात मदत केली. पण शेवटी फलंदाजी करणारा रवींद्र जडेजा किंवा इतर फलंदाज फलंदाजीत तितकेसे प्रभावी दिसत नाहीत. 

दुबेने आतापर्यंत ८ सामन्यात ३११ धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत शिवम दुबेवर जास्त अवलंबून राहणे चेन्नईसाठी मोठी समस्या ठरू शकते. कारण एखाद्या सामन्यात दुबे लवकर बाद झाला तर, सीएसकेला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

३) कमकुवत फिरकी गोलंदाजी

चेन्नईकडे मथिशा पाथिराना आणि मुस्तफिझूर रहमानसारखे चांगले वेगवान गोलंदाज आहेत, परंतु संघाचे फिरकी गोलंदाजी आक्रमण तितकेच कमकुवत दिसते. संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाही आतापर्यंत संघर्ष करताना दिसला आहे. 

याशिवाय श्रीलंकेचा फिरकीपटू महिष थिक्षाना यालाही संधी देण्यात आली, मात्र तोही अपयशी ठरला. अशा स्थितीत संघासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

धोनीची ही इच्छाही अपूर्णच राहू शकते

दरम्यान, काही वर्षांपूर्वी धोनीने आपला शेवटचा सामना चेपॉकमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी आयपीएलचा अंतिम सामना चेपॉकमध्ये होणार आहे. अशा स्थितीत चेपॉकच्या मैदानावर धोनी फायनल खेळेल आणि चॅम्पियन बनून रिटायर होईल, असे चाहत्यांना वाटत आहे. 

पण यावेळी चेन्नई सुपर किंग्सचे ट्रॉफी जिंकणे फारच कठीण दिसते. अशा परिस्थितीत चेपॉकमध्ये शेवटचा सामना खेळण्याची धोनीची इच्छा अपूर्ण राहू शकते. आता स्पर्धेच्या शेवटी काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

IPL_Entry_Point