मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  GT Vs KKR : गुजरात-कोलकाता सामना पावसामुळे रद्द, शुभमन गिलचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

GT Vs KKR : गुजरात-कोलकाता सामना पावसामुळे रद्द, शुभमन गिलचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 13, 2024 10:54 PM IST

GT Vs KKR IPL 2024 : आयपीएल २०२४ चा ६३ वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने आहेत.

Gujarat Titans vs Kolkata Knight Riders
Gujarat Titans vs Kolkata Knight Riders

इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ६३ वा सामना आज (१३ मे) गुजरात टायटन्स सामना कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जाणार होता, पण हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अहमदाबादमध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे सामना रद्द करावा लागला. हा सामना रद्द झाल्याने गुजरातचे नुकसान झाले आहे. हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सामना रद्द झाल्यानंतर गुजरात आणि कोलकाता यांना १-१ गुण प्रदान करण्यात आले. कोलकाता गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि आधीच पात्र ठरला आहे.

शुभमन गिलच्या गुजरातच्यासाठी हा करा किंवा मरो सामना होता. गुजरातने आतापर्यंत १३ पैकी ५ सामने जिंकले आहेत आणि ७ गमावले आहेत. हा सामना पावसाने वाहून गेला. अशाप्रकारे गुजरातचा संघ ११ गुणांसह गुणतालिकेत ८व्या क्रमांकावर आहे.

दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाने प्लेऑफमधील आपले स्थान आधीच पक्के केले आहे. त्यांनी आतापर्यंत १३ पैकी ९ सामने जिंकले आहेत. ३ सामने गमावले आणि एक पावसाने वाहून गेला. KKR १९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

आता प्लेऑफमध्ये पोहोचण्याची स्पर्धा ६ संघांमध्ये आहे. अजूनही ३ जागा रिक्त आहेत. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे स्पर्धेतील संघ आहेत.

सामना रद्द झाल्यानंतर गुजरातच्या खेळाडूंनी मैदानात फिरून चाहत्यांचे आभार मानले.

दोन्ही संघ

गुजरात टायटन्स - शुभमन गिल (कर्णधार), मॅथ्यू वेड (विकेटकीपर), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी, संदीप वॉरियर, अभिनव मनोहर, शरथ बीआर, दर्शन नळकांडे, जयंत यादव, जोशुआ लिटल, रविश्रीनिवासन साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला ओमरझाई, मानव सुथार, सुशांत मिश्रा, विजय शंकर, केन विल्यमसन, वृद्धिमान साहा.

कोलकाता नाइट रायडर्स - फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, सुयश शर्मा , रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी, मनीष पांडे, दुष्मंथा चमीरा, श्रीकर भारत, चेतन साकारिया, शेरफान रदरफोर्ड, साकिब हुसैन, अल्लाह गझनफर.

IPL_Entry_Point