आयपीएल २०२४ च्या ६३व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. केकेआर आधीच प्लेऑफसाठी पात्र झाले आहेत, या सामन्यात ते त्यांची बेंच स्ट्रेंथ तपासू शकतात. तर प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी गुजरातला हा सामना जिंकावाच लागणार आहे.
गुजरातने त्यांच्या याआधीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध २३१ धावा केल्या होत्या आणि ३५ धावांनी शानदार विजय नोंदवला होता. सलामीवीर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी ऐतिहासिक शतके झळकावली होती. केकेआरचे आव्हान पेलण्यासाठी दोन्ही खेळाडूंना आणखी एका दमदार कामगिरी करण्याची गरज आहे.
तर दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या याआधीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर १८ धावांनी शानदार विजय मिळवून प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. या हंगामात कोलकाताने पहिल्या १२ सामन्यात ९ विजय मिळवून स्पर्धेत वर्चस्व राखले आहे.
अशा परिस्थितीत केकेआर असो की गुजरात, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यष्टिरक्षक: फिल सॉल्ट
फलंदाज: व्यंकटेश अय्यर, शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन
अष्टपैलू: सुनील नरेन (उपकर्णधार), आंद्रे रसेल, शाहरुख खान
गोलंदाज: हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, मोहित शर्मा, राशिद खान
आयपीएलमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत एकूण ३ वेळा भिडले आहेत, त्यापैकी गुजरातने २ सामने जिंकले आहेत, तर केकेआरने फक्त एकच सामना जिंकला आहे.
केकेआर संभाव्य इलेव्हन: फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, नितीश राणा, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
गुजरात टायटन्स संभाव्य इलेव्हन-संभाव्य इलेव्हन: शुभमन गिल (कर्णधार), साई सुधारसन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक त्यागी.
संबंधित बातम्या