मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2024 Purple Cap List: खलील अहमदची टॉप-५ मध्ये एन्ट्री, जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी कायम

IPL 2024 Purple Cap List: खलील अहमदची टॉप-५ मध्ये एन्ट्री, जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी कायम

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 13, 2024 01:37 AM IST

RCB vs DC: रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध सामन्यात खलील अहमदने दमदार गोलंदाजी केली.

दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ऑरेंज कॅपच्या यादीत प्रवेश केला.,
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ऑरेंज कॅपच्या यादीत प्रवेश केला., (IPL-X)

IPL 2024:  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यात रविवारी आयपीएल २०२४ मधील ६२ वा सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने (Khaleel Ahmed) ३१ धावांत दोन विकेट्स घेत आयपीएल २०२४ पर्पल कॅपच्या (IPL 2024 Purple Cap) शर्यतीत पाचव्या स्थानावर झेप घेतली. खलील अहमदच्या या कामगिरीच्या जोरावर दिल्लीने बंगळुरुला २० षटकांत १८७ धावांवर रोखले. बंगळुरुकडून रजत पाटीदारने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली.

ट्रेंडिंग न्यूज

१८८ धावांचा पाठलाग करताना अक्षर पटेलच्या (५७ धावा) अर्धशतकानंतरही दिल्लीचा संघ १९.१ षटकांत १४० धावांवर आटोपला. बंगळुरूकडून यश दयालने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. हा सामना एकतर्फी ठरला आणि बंगळुरूने सहज हा सामना जिंकला.

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पर्पल कॅपच्या शर्यतीत १३ सामन्यांत २० विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे आणि पंजाब किंग्जचा हर्षल पटेल (२०) दुसऱ्या स्थानावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (१८) तिसऱ्या, चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज तुषार देशपांडे (१६) चौथ्या आणि खलील १६ विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहे.

IPL 2024 Purple Cap race
IPL 2024 Purple Cap race

रविवारी दिल्लीच्या पराभवानंतर बोलताना अक्षर पटेल म्हणाला, "कॅच सोडल्याने आम्हाला त्रास झाला. त्यांना १५० पर्यंत रोखता आले असते. खेळपट्टी दुतर्फा होती. धावांचा पाठलाग करताना जेव्हा तुमचे मुख्य खेळाडू रन आऊट होतात आणि पॉवरप्लेमध्ये तुम्ही चार गमावता, त्यावेळी धावांचा पाठलाग करणे कठीण होऊन जाते. पण हा खेळ आहे. काहीह होऊ शकते.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन म्हणाला की, "आम्ही सर्व जण संपूर्ण स्पर्धेत खूप मेहनत घेत आहोत. हंगामाच्या सुरुवातीला आम्ही बरेच सामने गमावले. मात्र, तेव्हाही आम्ही अशीच मेहनत घेत होतो. आम्हाला माहिती होते की, गोष्टी लवकरच ठिक होतील. फलंदाजांनी अत्यंत चांगली कामगिरी केली. आमचा पुढचा सामना चेन्नई सुपरकिंग्जसोबत आहे. बंगळुरुच्या खेळपट्टीवर गोलंदाजी आव्हानात्मक असू शकते.

IPL_Entry_Point