मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  MS Dhoni : धोनी चेन्नईचा देव, लवकर मंदिर बांधा, भारताच्या दिग्गज खेळाडूनं केली मागणी

MS Dhoni : धोनी चेन्नईचा देव, लवकर मंदिर बांधा, भारताच्या दिग्गज खेळाडूनं केली मागणी

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 13, 2024 02:14 PM IST

MS Dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू अंबाती रायडूने एक वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. रायडू म्हणाला की, चेन्नईत धोनीचे मंदिर बांधले पाहिजे."

MS Dhoni : धोनी चेन्नईचा देव, लवकर मंदिर बांधा, भारताच्या दिग्गज खेळाडूनं केली मागणी
MS Dhoni : धोनी चेन्नईचा देव, लवकर मंदिर बांधा, भारताच्या दिग्गज खेळाडूनं केली मागणी (PTI)

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू एम एस धोनी सध्या आयपीएल २०२४ मध्ये व्यस्त आहे. चेन्नईत रविवारी (१२) त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना खेळला. हा चेन्नईचा यंदाचा त्यांच्या होम ग्राऊंडवरील शेवटचा सामना होता. 

ट्रेंडिंग न्यूज

चेन्नई सुपर किंग्जने रविवारी आयपीएल २०२४ च्या ६१व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ५ गडी राखून पराभव केला आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या.

यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघ आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. सीएसकेने १३ सामन्यांत ७ विजय नोंदवले आहेत. धोनीने चालू हंगामातील शेवटचा सामना चेपॉक स्टेडियमवर खेळला, पण या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

दरम्यान, आता चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू अंबाती रायडूने एक वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. रायडू म्हणाला की, चेन्नईत धोनीचे मंदिर बांधले पाहिजे."

चेन्नईमध्ये धोनीचे मंदिर बांधले जाईल

धोनीने टीम इंडिया आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. ही कामगिरी लक्षात घेता, चेन्नईमध्ये एमएस धोनीचे मंदिर बांधले जाऊ शकते".

रजनीकांत आणि खुशबू यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची मंदिरे चाहत्यांनी बांधली आहेत. या यादीत एमएस धोनीचा समावेश केला जाऊ शकतो, कारण त्याने भारतीय आणि चेन्नईच्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. 

रायुडू स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला, की "एमएस धोनी हा चेन्नईचा देव आहे आणि मला विश्वास आहे की त्याचे मंदिर येत्या काही वर्षांत चेन्नईमध्ये बांधले जाईल."

रायुडूने धोनीचे खूप कौतुक केले

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने ५ आयपीएल विजेतेपद पटकावले आहेत. धोनीने चॅम्पियन्स लीग T20 चे विजेतेपदही दोनदा जिंकले.

एमएस धोनी हा असा कर्णधार आहे, की ज्याने दोन विश्वचषक जिंकून भारताला आनंद दिला आणि अनेक आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग विजेतेपदे जिंकून चेन्नईच्या चाहत्यांना आनंद दिला. तो आपल्या खेळाडूंवर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे, ज्याने संघ, देश आणि CSK साठी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. एमएस धोनी एक दिग्गज आहे आणि त्याच्याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे'. 

शेवटचा सामना आरसीबीविरुद्ध खेळणार

चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवल्यानंतर चेपॉक स्टेडियमवर राऊंड मारला आणि प्रेक्षकांचे आभार मानले. चेन्नई सुपर किंग्ज आता आपला शेवटचा साखळी सामना १८ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळणार आहे.

IPL_Entry_Point