आयपीएल २०२४ मध्ये काही दिवसांपूर्वी लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आणि फ्रेंचायझीचे मालक संजीव गोएंका यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या होत्या. पण आता या व्हिडीओबाबत आणि केएल राहुल याच्याबाबत लखनौ सुपर जायंट्सचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुजनर यांनी नवी माहिती दिली आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर संजीव गोयंका हे संतापले होते आणि संतापाच्या भरात त्यांनी राहुलची खरडपट्टी काढली होती. अशी चर्चा सोशळ मीडियावर सुरू होती.
पण आता क्लूसनरने यावर वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, दोन क्रिकेट प्रेमींमधील हे सामान्य संभाषण होते."
एका वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, क्लुसनर म्हणाले, की “मला वाटते की हे दोन क्रिकेट प्रेमींमधील संभाषण होते. आम्हाला स्पष्ट संभाषण करायला आवडते. मला यात काही अडचण दिसत नाही. अशा संभाषणामुळे संघ अधिक चांगला होतो. आमच्यासाठी ही कोणत्याही प्रकारे मोठी गोष्ट नाही. राहुल चांगल्या ठिकाणी असून गेल्या अनेक सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे”.
सनरायझर्स हैदराबादने एका सामन्यात लखनौचा वाईट पद्धतीने पराभव केला होता. या सामन्यानंतर गोयंका कर्णधार केएल राहुलवर चिडताना दिसले. त्यामुळे गोएंका सोशल मीडियावर ट्रोलही झाले होते. या प्रकरणानंतर राहुल संघाचे कर्णधारपद सोडू शकतो, अशा बातम्याही आल्या होत्या.
मात्र, अद्याप असे काहीही झालेले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे राहुलनेही या प्रकरणी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.
आयपीएल २०२४ मध्ये लखनऊने आतापर्यंत १२ सामने खेळले आहेत. या दरम्यान संघाने ६ सामने जिंकले असून ६ सामने गमावले आहेत. लखनौचे १२ गुण आहेत. आता त्यांचे दोन सामने बाकी आहेत. लखनौचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी आहे. यानंतर त्याचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.
संबंधित बातम्या