KKR VS SRH Qualifier 1 : आयपीएल २०२४ चा पहिला क्वालिफायर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील मंगळवारी (२१ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.
कोलकाता नाईट रायडर्स संघ आयपीएलच्या इतिहासात प्रथमच पॉइंट टेबलमध्ये नंबर-वन बनला आणि प्लेऑफसाठी पात्र ठरला. त्याचवेळी, सनरायझर्स हैदराबादने साखळी फेरीतील त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्जचा ४ विकेटने पराभव केला होता. अशाप्रकारे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबाद गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचा आहे.
या हाय व्होल्टेज मॅचची लाईव्ह ॲक्शन संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. नाणेफेक अर्धा तास आधी होणार आहे. दोन्ही संघ कोणत्या ११ खेळाडूंसोबत मैदानात उतरणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.
अशा स्थितीत, केकेआर असो की हैदराबाद, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यष्टिरक्षक - हेनरिक क्लासेन
फलंदाज - श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी.
अष्टपैलू खेळाडू- आंद्रे रसेल, सुनील नरेन (कर्णधार)
गोलंदाज - भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, वरुण चक्रवर्ती.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फलंदाज खूप धावा करताना दिसतात. नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला मदत करतो, पण जसजसा सामना पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी फिरकीपटूंसाठीही उपयुक्त ठरते. मात्र, येथे लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ नेहमीच फायद्यात राहतो. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला पाठलाग करायला आवडेल.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएलचे एकूण ३३ सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने १५ सामने जिंकले आहेत, तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने १८ सामने जिंकले आहेत. येथे प्रथम फलंदाजी करताना सरासरी १६ धावा आहेत, तर या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या २३३ धावा आहे, जी गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात केली होती.
चालू हंगामात या मैदानावर एकूण ६ सामने खेळले गेले, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २ जिंकले, तर पाठलाग करणाऱ्या संघाने ४ सामने जिंकले.
केकेआर आणि हैदराबाद दोन्ही संघांमध्ये एकूण २६ सामने खेळले गेले, ज्यामध्ये केकेआरने १७ सामने जिंकले, तर सनरायझर्स हैदराबादने ९ सामने जिंकले. या मोसमात दोन्ही संघांमध्ये एक सामना झाला, ज्यामध्ये केकेआरने हैदराबादचा पराभव केला होता.
संबंधित बातम्या