SRH Playoffs Record : वॉर्नरने करून दाखवलं… आता कमिन्सला संधी, प्लेऑफमध्ये हैदराबादचा रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH Playoffs Record : वॉर्नरने करून दाखवलं… आता कमिन्सला संधी, प्लेऑफमध्ये हैदराबादचा रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या

SRH Playoffs Record : वॉर्नरने करून दाखवलं… आता कमिन्सला संधी, प्लेऑफमध्ये हैदराबादचा रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या

May 21, 2024 02:05 PM IST

Sunrisers Hyderabad IPL Playoff Record : आयपीएल २०२४ चा पहिला क्वालिफायर कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी जाणून घेऊया प्लेऑफमध्ये हैदराबादचा रेकॉर्ड कसा आहे.

SRH Playoffs Record : वॉर्नरने करून दाखवलं… आता कमिन्सला संधी, प्लेऑफमध्ये हैदराबादचा रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या
SRH Playoffs Record : वॉर्नरने करून दाखवलं… आता कमिन्सला संधी, प्लेऑफमध्ये हैदराबादचा रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या (AFP)

Sunrisers Hyderabad IPL Playoff Record : पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद आयपीएल २०२४ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. शेवटचा साखळी सामना जिंकून संघाने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. आता कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पहिला क्वालिफायर खेळणार आहे. 

या दोघांमधील सामना आज म्हणजेच मंगळवारी (२१ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पण या सामन्यापूर्वी जाणून घेऊया, प्लेऑफ सामन्यांमध्ये हैदराबादचा रेकॉर्ड कसा आहे.

सनरायझर्स हैदराबादने २०१६ मध्ये विजेतेपद पटकावले आहे. हैदराबादने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळताना आयपीएल २०१६ चे विजेतेपद पटकावले. या संघाने अंतिम फेरीत बेंगळुरूचा पराभव केला होता. यानंतर २०१८ मध्ये सनरायझर्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता, पण तिथे त्यांना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

सनरायझर्स हैदराबादने प्लेऑफमध्ये किती सामने जिंकले?

सनरायझर्स हैदराबाद संघाने आतापर्यंत प्लेऑफ/नॉकआउटमध्ये एकूण ११ सामने खेळले आहेत. संघाने ११ पैकी केवळ ५ सामने जिंकले आहेत, तर ६ सामने गमावले आहेत. ५ सामन्यांमध्ये हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ३ सामने जिंकले आणि लक्ष्याचा पाठलाग करताना २ सामने जिंकले.

हैदराबादची प्लेऑफमध्ये सर्वोच्च आणि सर्वात कमी धावसंख्या

हैदराबादने प्लेऑफ सामन्यांमध्ये सर्वाधिक २०८/७ धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएल २०१६ च्या अंतिम सामन्यात संघाने ही धावसंख्या केली होती.

तर प्लेऑफ टप्प्यात, हैदराबादची सर्वात कमी धावसंख्या १२८/७ होती, जी त्यांनी IPL २०१७ मध्ये KKR विरुद्ध दुसऱ्या क्वालिफायरमध्ये केली होती.

याशिवाय, प्लेऑफमध्ये धावांचा पाठलाग करताना हैदराबादने १९.२ षटकात ६ बाद १६३ धावांचे लक्ष्य गाठले होते. आयपीएल २०१६ च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये टीमने गुजरात लायन्सविरुद्ध हा विजय नोंदवला होता.

प्लेऑफमध्ये संघासाठी सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट

प्लेऑफ सामन्यांमध्ये हैदराबादसाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्याच्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा भाग असलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. प्लेऑफमध्ये वॉर्नरने हैदराबादसाठी २४६ धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीत भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ९ बळी घेतले.

Whats_app_banner