इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज (२१ मे) क्वालिफायर वन सामना खेळला गेला. यामध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते. अमहमदाबादच्या नरेंद्रम मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात केकेआरने हैदराबादचा ८ विकेट्सनी पराभव केला.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) शानदार कामगिरीसह इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आयपीएलच्या इतिहासातील केकेआर संघाचा हा चौथा अंतिम सामना असेल.
केकेआरने मंगळवारी (२१ मे) IPL २०२४ चा पहिला क्वालिफायर सामना खेळला, ज्यामध्ये त्यांनी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेटने पराभव केला. या पराभवानंतरही हैदराबाद संघाला आणखी एक संधी मिळणार असून त्यांना क्वालिफायर-दोन खेळावे लागणार आहे.
या क्वालिफायर-वन सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात केकेआरने १३.४ षटकांत २ गडी गमावून सामना जिंकला. तसेच फायनलमध्ये प्रवेश केला.
केकेआरसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने २४ चेंडूत ५८ धावांची नाबाद खेळी केली. तर व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ४४ चेंडूत ९७ धावांची नाबाद भागीदारी झाली. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि टी नटराजन यांनी १-१ विकेट घेतली.
केकेआरचा फलंदाज व्यंकटेश अय्यरने शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. KKR संघ आता विजयाच्या जवळ आहे आणि त्यांना ४२ चेंडूत १८ धावांची गरज आहे. व्यंकटेशसोबत श्रेयस अय्यरही क्रीजवर आहे.
पहिला धक्का बसला तरी कोलकाताने पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी केली. संघाने ६ षटके संपल्यानंतर एका विकेटवर ६३ धावा केल्या आहेत. सुनील नरेन १४ चेंडूत १७ धावांवर तर व्यंकटेश अय्यर ८ चेंडूत १२ धावांवर खेळत आहे.
टी. नटराजनने सलामीवीर रहमानउल्ला गुरबाजला बाद करून केकेआरला पहिला धक्का दिला. गुरबाज १४ चेंडूत २३ धावा करून बाद झाला.
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादला १९.३ षटकांत १५९ धावांत गुंडाळले. केकेआरला अंतिम फेरी गाठण्यासाठी १६० धावा करायच्या आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबाद संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने केवळ ३९ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. यानंतर राहुल त्रिपाठीने ३५ चेंडूत ५५ धावा आणि हेनरिक क्लासेनने २१ चेंडूत ३२ धावा केल्या.
हैदराबादचे १२६ धावांत ९ विकेट पडल्या होत्या, त्यानंतर पॅट कमिन्सने शेवटी २४ चेंडूत ३० धावा करत धावसंख्या १५० च्या पुढे नेली.
त्याआधी त्रिपाठी आणि क्लासेन यांनी पाचव्या विकेटसाठी ३७ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. अखेरीस पॅट कमिन्सने ३० धावा केल्या. याशिवाय एकाही फलंदाजाला २० चा आकडा गाठता आला नाही. तर KKR संघासाठी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ बळी घेतले. वरुण चक्रवर्तीने २ बळी घेतले. वैभव अरोरा, सुनील नरेन, आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांना प्रत्येकी १ विकेट मिळाला.
सनरायझर्स हैदराबादला राहुल त्रिपाठीच्या रूपाने सहावा धक्का बसला आहे. सेट फलंदाज राहुल धावबाद झाला आणि त्याची शानदार खेळी संपुष्टात आली. राहुल ३५ चेंडूत ५५ धावा करून बाद झाला. हैदराबादचा डाव पुन्हा एकदा गडगडला असून संघाने १२१ धावांवर ६ विकेट गमावल्या आहेत. आता सनवीर सिंगने इम्पॅक्ट प्लेयर म्हणून केला आहे.
फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने हेनरिक क्लासेनला बाद करून हैदराबादला पाचवा धक्का दिला. क्लासेनने राहुल त्रिपाठीसह शानदार फलंदाजी केली, मात्र वरुणने क्लासेनला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. क्लासेन २१ चेंडूत ३२ धावा करून बाद झाला.
राहुल त्रिपाठीने कठीण परिस्थितीत शानदार फलंदाजी करत कोलकाताविरुद्ध झळकावले. तो ३० चेंडूत ५१ धावांवर खेळत आहे.
केकेआरने प्रथम फलंदाजीला आलेल्या हैदराबादला सुरुवातीलाच धक्के दिले. हैदराबादने ८ षटकांचा खेळ संपल्यानंतर ४ गड्यांच्या मोबदल्यात ६२ धावा केल्या आहेत. सध्या राहुल त्रिपाठी २१ चेंडूत ३४ धावा करून क्रीजवर उपस्थित आहे आणि हेनरिक क्लासेनने ११ चेंडूत ११ धावा केल्या आहेत.
स्टार्कने या सामन्यातील तिसरी विकेट घेतली आणि शाहबाज अहमदला बाद केले. शाहबाज अहमद खाते न उघडताच बाद झाला. पाचव्या षटकाच्या अखेरीस हैदराबादच्या ३९ धावा झाल्या होत्या आणि संघाच्या ४ विकेट्स गेल्या आहेत. आता हेनरिक क्लासेन आला आहे.
मिचेल स्टार्कने आपली चमकदार गोलंदाजी सुरू ठेवत पॉवरप्लेमध्ये हैदराबादला आणखी एक धक्का दिला. स्टार्कने नितीश रेड्डीला बाद केल्यामुळे हैदराबादचा डाव गडगडला. नितीश रेड्डी १० चेंडूत ९ धावा करून बाद झाला.
वैभव अरोराने हैदराबादच्या अभिषेक शर्माला बाद करून केकेआरला दुसरे यश मिळवून दिले. अभिषेक चार चेंडूत ३ धावा करून बाद झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही आणि दोन षटकांअखेर संघाने २ गडी गमावले. सध्या नितीश रेड्डी राहुल त्रिपाठीसह क्रीजवर आहेत.
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला क्लीन बोल्ड करून केकेआरला पहिले यश मिळवून दिले. हेड शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. आता राहुल त्रिपाठी क्रीझवर आला असून त्याच्यासोबत अभिषेक शर्मा उपस्थित आहे.
कोलकाता नाइट रायडर्स : रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट सब: अनुकुल रॉय, मनीष पांडे, नितीश राणा, केएस भरत, शेरफेन रदरफोर्ड.
सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी. नटराजन.
इम्पॅक्ट सब: सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने या महत्त्वाच्या सामन्यासाठी प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि पंजाब किंग्जविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या सामन्यातील तोच संघ कायम ठेवला आहे. दुसरीकडे, केकेआरनेही प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या