मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  KKR vs SRH Weather : क्वालिफायर सामना पावसामुळे रद्द झाला तर फायनलमध्ये कोण जाणार? संपूर्ण नियम येथे जाणून घ्या

KKR vs SRH Weather : क्वालिफायर सामना पावसामुळे रद्द झाला तर फायनलमध्ये कोण जाणार? संपूर्ण नियम येथे जाणून घ्या

May 21, 2024 04:47 PM IST
  • twitter
  • twitter
  • IPL 1st Qualifier, KKR vs SRH Weather Forecast and Rule : आयपीएल २०२४ मध्ये आज प्लेऑफ सामन्यांना सुरुवात होत आहे. क्वालिफायर वन सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद सायंकाळी ७:३० वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आमनेसामने येतील. पण या सामन्यात पावसाचा अडथळा येऊ शकतो.
केकेआर-हैदराबाद यांच्यातील क्वालिफायर सामन्यापेक्षाही अधिक चर्चा पावसाची होत आहे. कारण IPL २०२४ मधील आतापर्यंत ३ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. अशा परिस्थितीत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील क्वालिफायर-१ सामन्यात पाऊस पडला तर काय होईल? हे जाणून घेऊया.
share
(1 / 6)

गेल्या आयपीएल सीझनमध्ये फक्त अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता, या हंगामात आयपीएलच्या चारही प्लेऑफ सामन्यांसाठी राखीव दिवस आहे.
share
(2 / 6)

Accuweather.com च्या मते, अहमदाबादमध्ये आज (२१ मे) पावसाची शक्यता कमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी अहमदाबादमधील हवामान आल्हाददायक आणि ऊन असेल. मात्र, दुसऱ्या डावात दव महत्त्वाची भूमिका बजावेल. सामन्यादरम्यान पाऊस पडल्यास षटकांमध्ये कपात होऊ शकते.
share
(3 / 6)

मुसळधार पाऊस पडल्यास सामना प्रत्येकी किमान ५ षटकांचा करण्याचा प्रयत्न केला जाईल. हेही शक्य नसेल तर सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. राखीव दिवशी, पावसामुळे सामना आदल्या दिवशी जिथे सोडला होता तिथून सुरू होईल.
share
(4 / 6)

केकेआरला मिळणार फायनलचं तिकीट? - राखीव दिवसही पावसामुळे वाहून गेला, तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ (KKR) अंतिम फेरीत पोहोचेल. कारण लीग टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. 
share
(5 / 6)

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघ १४ सामन्यांत २० गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबाद संघ १४ सामन्यांत १७ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. नियमांनुसार, पॉइंट टेबलमध्ये चांगल्या स्थितीत असल्यामुळे, सामना रद्द झाल्यास कोलकाता नाइट रायडर्सला फायनलचे तिकीट मिळेल. 
share
(6 / 6)

टी-२० वर्ल्डकप २०२४

इतर गॅलरीज