dinesh kartik helmet : दिनेश कार्तिकचं हेल्मेट इतर खेळाडूंपेक्षा वेगळं का असतं? कारणासह समजून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  dinesh kartik helmet : दिनेश कार्तिकचं हेल्मेट इतर खेळाडूंपेक्षा वेगळं का असतं? कारणासह समजून घ्या

dinesh kartik helmet : दिनेश कार्तिकचं हेल्मेट इतर खेळाडूंपेक्षा वेगळं का असतं? कारणासह समजून घ्या

Updated May 21, 2024 03:36 PM IST

Dinesh Karthik Helmet : कार्तिक फलंदाजी आणि विकेटकीपिंग करताना वापरत असलेल्या हेल्मेटची रचना वेगळी आहे. कार्तिक ज्या प्रकारचे हेल्मेट वापरतो त्याला 'माइंड 2.0 हेल्मेट' असे म्हणतात. अशा

Dinesh Karthik Helmet : दिनेश कार्तिकचं हेल्मेट बाकीच्यांपेक्षा वेगळे का आहे? कारणासह समजून घ्या
Dinesh Karthik Helmet : दिनेश कार्तिकचं हेल्मेट बाकीच्यांपेक्षा वेगळे का आहे? कारणासह समजून घ्या (AFP)

Dinesh Karthik Mind 2.0 Helmet : आयपीएल २२०४ मध्ये दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळत आहे. कार्तिकने मोसमाच्या सुरुवातीला काही शानदार खेळी खेळल्या. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या स्पर्धेतील ३०व्या सामन्यात कार्तिकने ३५ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. पण या सगळ्या दरम्यान तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की दिनेश कार्तिक इतर फलंदाजांच्या तुलनेत वेगळ्या प्रकारचे हेल्मेट वापरतो. 

पण तो असे का करतो? हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर आम्ही तुम्हाला या मागची संपूर्ण कहाणी समजावून सांगणार आहोत.

कार्तिक फलंदाजी आणि विकेटकीपिंग करताना वापरत असलेल्या हेल्मेटची रचना वेगळी आहे. कार्तिक ज्या प्रकारचे हेल्मेट वापरतो त्याला 'माइंड 2.0 हेल्मेट' असे म्हणतात. अशा प्रकारचे हेल्मेट कुमार संगकारा आणि राहुल त्रिपाठी सारखे फलंदाज देखील वापरतात. हे हेल्मेट वापरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याचे वजन कमी आहे. तर इतर सामान्य हेल्मेटचे वजन १ ते १.२५ किलो दरम्यान असते.

दुसरीकडे, 'माइंड 2.0 हेल्मेट'चे वजन सुमारे ८०० ग्रॅम आहे. वजन कमी असल्याने हे हेल्मेट घालून खेळाडू चांगल्या हालचाली करू शकतात. वजनाप्रमाणे या हेल्मेटची किंमतही कमी आहे. या कारणांमुळे खेळाडू 'माइंड 2.0 हेल्मेट' वापरतात. दिनेश कार्तिक अनेक दिवसांपासून अशा प्रकारचे हेल्मेट वापरत आहे.

आयपीएल २०२४ मध्ये कार्तिक जबरदस्त फॉर्मात

सध्याच्या हंगामात म्हणजेच आयपीएल २०२४ मध्ये कार्तिकच्या बॅटमधून काही अतिशय शानदार खेळी पाहायला मिळाल्या. कार्तिकने १४ सामन्यात ३९.३८ च्या सरासरीने आणि १९६.६५ च्या स्ट्राईक रेटने ३१५ धावा केल्या. या काळात त्याने २ अर्धशतके झळकावली. कार्तिकने २६ चौकार आणि २२ षटकार मारले. 

कार्तिक बेंगळुरूसाठी खालच्या क्रमवारीत फिनिशरची भूमिका बजावतो. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात कार्तिकने ६ चेंडूत १४ धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी खेळली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या