IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोलकाता नाइट रायडर्सचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली. याशिवाय, याशिवाय त्याला मॅच फीच्या १०० टक्के दंडही ठोठावण्यात आला. हर्षितने आचारसंहितेचे पालन न करण्याची ही दुसरी वेळ आहे. आयपीएल २०२४ मध्ये नियमांचे पालन न केल्यामुळे बंदीचा सामना करणारा हर्षित राणा पहिला खेळाडू ठरला आहे.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर काल झालेल्या ४७ व्या सामन्यात राणाआयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.५ अन्वये लेव्हल १ च्या गुन्ह्यात दोषी आढळला होता. त्याने उल्लंघनाची कबुली दिली आणि मॅच रेफरीची शिक्षा स्वीकारली, ज्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.
शिस्तभंगाच्या धक्क्यानंतरही हर्षित राणाने आयपीएल २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि आपल्या असामान्य गोलंदाजी कौशल्याने प्रभावित केले आहे ज्यामुळे त्याने केवळ आठ सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतले. सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज मयांक अग्रवालला आऊट झाल्यानंतर त्याला फ्लाईंग-किस दिल्याबद्दल बीसीसीआयने राणाला मॅच फीच्या ६० टक्के दंड ठोठावला होता.
दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२४ मधील ४७ वा सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिल्लीचा हा निर्णय चुकला. वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा आणि वैभव अरोराच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्ली संघाने गुडघे टेकले. दिल्लीने २० षटकात ९ विकेट्स गमावून १५३ धावा केल्या. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, हर्षित राणा आणि वैभव आरोराने प्रत्येकी दोन- दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात कोलकाताच्या संघाने सात विकेट्स राखून हा सामना जिंकला.
फिलिप सॉल्ट (विकेटकिपर), सुनील नारायण, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, रमणदीप सिंह, अंगक्रिश रघुवंशी, दुष्मंथा चमीरा, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज, मिचेल स्टार्क, अल्लाह गझनफर, साकिब हुसैन, शेरफेन रदरफोर्ड, चेतन साकारिया, नितीश राणा, श्रीकर भारत.
संबंधित बातम्या