IPL 2024: आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामना खेळला जणार आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू एकमेकांशी भिडणार आहेत. तर, दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार आहे. चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी चेन्नईला हैदराबादविरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक आहे. गेल्या सामन्यात चेन्नईला लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
या हंगामात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबादच्या संघाने वेगळ्या अंदाजात फलंदाजी केली आहे. हैदराबादने तीन वेळा २५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. चेन्नईविरुद्ध सामन्यातही हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. दुसरीकडे चेन्नईच्या फलंदाजांनी निराश केले आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि ऑलराऊंडर शिवम दुबे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजांना खेळात सातत्य राखता आले नाही.
चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात शनिवारी (२६ एप्रिल २०२४) आयपीएलमधील ४६ वा सामना खेळला जाईल. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील सामना दुपारी ७.३० वाजता सुरु होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजीसह देशातील इतर भाषांमध्ये पाहू शकतो. जिओ सिनेमा ॲपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय, https://marathi.hindustantimes.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.
अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड(कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकिपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथिराना, शार्दुल ठाकूर, समीर रिझवी, शेख रशीद, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, रिचर्ड ग्लेसन, अजय जाधव मंडल, प्रशांत सोळंकी, मुकेश चौधरी, सिमरजीत सिंग, आरएस हंगरगेकर, महेश थेक्षाना, निशांत सिंधू, अरावेली अवनीश
अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, टी नटराजन, ट्रॅव्हिस हेड, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग
संबंधित बातम्या