KKR vs MI : केकेआरने मुंबईच्या जबड्यातून विजय हिसकावला, शाहरूख खानची टीम प्लेऑफमध्ये
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR vs MI : केकेआरने मुंबईच्या जबड्यातून विजय हिसकावला, शाहरूख खानची टीम प्लेऑफमध्ये

KKR vs MI : केकेआरने मुंबईच्या जबड्यातून विजय हिसकावला, शाहरूख खानची टीम प्लेऑफमध्ये

May 12, 2024 12:44 AM IST

KKR vs MI IPL 2024 Highlights : कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव केला आहे. १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने एकवेळ ५ षटकांत एकही विकेट न घेता ५९ धावा केल्या होत्या. पण शेवटी केकेआरच्या गोलंदाजांनी विजय खेचून आणला.

KKR vs MI IPL 2024 Highlights
KKR vs MI IPL 2024 Highlights

KKR vs MI Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ६० वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर केकेआरने निर्धारित १६ षटकात ७ बाद १५७ धावा केल्या.

पावसामुळे सामना २ तास १५ मिनिटे उशिराने सुरू झाला त्यामुळे सामना १६-१६ षटकांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

प्रत्युत्तरात मुंबईला ८ विकेट्सवर केवळ १३९ धावा करता आल्या. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले. चालू मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचणारा कोलकाता पहिला संघ ठरला आहे.

१५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने एके काळी ५ षटकांत एकही विकेट न गमावता ५९ धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर केकेआरच्या फिरकीपटूंनी धावांचा वेग रोखून नियमित अंतराने विकेट्स घेतल्या. 

मुंबईकडून इशान किशनने २२ चेंडूत ४० धावा केल्या. तर तिलक वर्माने १७ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. बाकीचे सर्व फलंदाज रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड सुपर फ्लॉप ठरले.

केकेआरचा डाव

तत्पूर्वी, केकेआरने २० षटकांत ७ विकेट गमावत १५७ धावा केल्या होत्या. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने २१ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४२ धावा केल्या. 

शेवटी नितीश राणाने २३ चेंडूत ३३ धावा, आंद्रे रसेलने १४ चेंडूत २० धावा आणि रिंकू सिंगने १२ चेंडूत २० धावा केल्या.

तर मुंबईसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी फिरकी गोलंदाज पियुष चावलाने प्रत्येकी २ बळी घेतले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या