मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Rishabh Pant Flies Kite: मुंबईविरुद्धच्या लाईव्ह सामन्यात ऋषभ पंत उडवू लागला पतंग, व्हिडिओ व्हायरल!

Rishabh Pant Flies Kite: मुंबईविरुद्धच्या लाईव्ह सामन्यात ऋषभ पंत उडवू लागला पतंग, व्हिडिओ व्हायरल!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 27, 2024 10:15 PM IST

Delhi Captitals vs Mumbai Indians: ऋषभ पंतने मैदानातच पतंग उडवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लाईव्ह सामन्यादरम्यान ऋषभ पंतचा पतंग उडवल्याच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
लाईव्ह सामन्यादरम्यान ऋषभ पंतचा पतंग उडवल्याच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

DC vs MI, IPL 2024: आयपीएल २०२४ च्या ४३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा १० धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या संघाने मुंबईसमोर २५७ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात मुंबईचा संघाला २० षटकात ९ विकेट्स गमावून २४७ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, मुंबईसाठी रोहित शर्मा आणि इशान किशन फलंदाजीला आले, तेव्हा मैदानात एक अनोखी घटना घडली. मुंबईच्या डावातील पहिल्या डावात पतंग कुठूनतरी उडून मैदानात आला. पतंगाला मैदानाबाहेर नेण्यापूर्वी ऋषभ पंतनेही तो हवेत उडवण्याचा प्रयत्न केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ऋषभ पंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दिल्लीच्या विजयापेक्षा पंतने मैदानात पतंग उडवल्याची अधिक चर्चा आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रोहित शर्माने पतंग उचलून ऋषभ पंतला दिला. परंतु, हा पतंग पंचाकडे देण्यापूर्वी ऋषभ पंतने तो उडवण्याचा प्रयत्न केला. ऋषभ पंतच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

DCs vs MI : जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या वादळानंतर होप आणि स्टब्सने मुंबईला झोडपलं, दिल्लीचा २५७ धावांचा डोंगर

मुंबईचा १० धावांनी पराभव

या सामन्यात मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. परंतु, दिल्लीचा युवा फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कने मुंबईच्या कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवला. त्याने सुरुवातीपासूनच झुंजार खेळीला केली. जेक फ्रेझर-मॅकगर्कच्या २७ चेंडूत वादळी ८४ धावा ठोकल्या. दिल्लीकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सर्वच फलंदाजांनी १३३ च्या वरच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. दिल्लीने मुंबईसमोर २५७ धावांचे लक्ष्य ठेवले. मुंबईचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहसह जवळपास सर्वच गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली. दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या मुंबईच्या संघाने अखरेच्या दोन षटकापर्यंत विजयाच्या अपेक्षा जिवंत ठेवल्या. मात्र, अखेरच्या षटकात दिल्लीच्या मुकेश कुमारने भेदक गोलंदाजी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.

दिल्लीची आतापर्यंतची सर्वोकृष्ट धावसंख्या

दिल्ली कॅपिटल्सने मुंबईविरुद्ध सामन्यात आपली सर्वोकृष्ट धावसंख्या उभारली आहे. या सामन्यात दिल्लीने २० षटकांत ४ विकेट गमावून २५७ धावा केल्या. दिल्लीच्या संघाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी दिल्लीने २०१३ मध्ये पंजाबविरुद्ध सामन्यात २३१ धावांचा डोंगर उभारला होता.

IPL_Entry_Point