DC VS MI Highlights : दिल्ली प्ले ऑफ्सच्या शर्यतीत कायम, २५७ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा १० धावांनी पराभव-dc vs mi ipl 2024 scorecard dc vs mi todays match highlights ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  DC VS MI Highlights : दिल्ली प्ले ऑफ्सच्या शर्यतीत कायम, २५७ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा १० धावांनी पराभव

DC VS MI Highlights : दिल्ली प्ले ऑफ्सच्या शर्यतीत कायम, २५७ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा १० धावांनी पराभव

Apr 27, 2024 07:51 PM IST

DC VS MI ipl 2024 Scorecard : आयपीएल २०२४ मध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. या सामन्यात दिल्लीने मुंबईचा १० धावांनी धुव्वा उडवला.

DC VS MI Highlights : दिल्ली प्ले ऑफ्सच्या शर्यतीत कायम, २५७ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा १० धावांनी पराभव
DC VS MI Highlights : दिल्ली प्ले ऑफ्सच्या शर्यतीत कायम, २५७ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा १० धावांनी पराभव (PTI)

DC VS MI ipl 2024 Highlights : आयपीएल २०२४ च्या ४३ व्या सामन्यात आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून २५७ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ २० षटकात ९ बाद २४७ धावाच करू शकला. मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने ३२ चेंडूत ६३ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले.  तर कर्णधार हार्दिक पांड्याने २४ चेंडूत ४६ आणि टीम डेव्हिडने १७ चेंडूत ३७ धावा केल्या. मात्र यापैकी कोणीही आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही.

मुंबई इंडियन्सची टॉप ऑर्डर आज पूर्णपणे फ्लॉप झाली. रोहित शर्मा ८, इशान किशन २० आणि सुर्यकूमार यादव २३ धाव करून बाद झाले. दिल्लीकडून गोलंदाजीत मुकेश कुमार आणि रसिक सलाम यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. दोघांनी ३-३ विकेट घेतल्या.

दिल्लीचा डाव

दिल्लीसाठी सलामीवीर जेक फ्रेझर-मॅकगर्कने १५ चेंडूत अर्धशतक केले. मात्र, आयपीएलमधील सर्वात वेगवान शतकाचा विक्रम मोडण्यात मॅकगर्कला अपयश आले. २७ चेंडूत ८४ धावा करून तो बाद झाला. या खेळीत त्याने ६ षटकार आणि ११ चौकार लगावले.

यानंतर ट्रिस्टन स्टब्सने ४८ धावांची नाबाद खेळी केली. अभिषेक पोरेलने ३६ धावांचे योगदान दिले. शाई होप ४१ धावा करून बाद झाला. अक्षर पटेल ११ धावा करून नाबाद राहिला.