मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  पॅट कमिन्सनं संपूर्ण परिवारासह घेतला हैद्राबादी बिर्याणीचा आस्वाद, चवीबाबत काय म्हणाला? जाणून घ्या

पॅट कमिन्सनं संपूर्ण परिवारासह घेतला हैद्राबादी बिर्याणीचा आस्वाद, चवीबाबत काय म्हणाला? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 27, 2024 05:07 PM IST

Pat Cummins Hyderabadi Biryani :सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने हैदराबादी बिर्याणीची चव चाखली आहे. तो आता हैदराबादी बिर्याणीचा चाहता झाला आहे.

pat cummins tasted hyderabadi biryani
pat cummins tasted hyderabadi biryani (AFP)

Pat Cummins tasted Hyderabadi Biryani : पॅट कमिन्स आयपीएल २०२४ मध्ये कर्णधार आणि गोलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी दाखवत आहे. या मोसमात कमिन्स सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व करत आहे. या हंगामासाठी झालेल्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन कर्णधाराला हैदराबादने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले होते.

ट्रेंडिंग न्यूज

आता, आयपीएल २०२४ दरम्यान कमिन्सने हैदराबादी बिर्याणीची चाखली आहे. कमिन्सने पहिल्यांदाच हैदराबादी बिर्याणी खाल्ली आणि तो आता या बिर्याणीचा चाहता झाला आहे.

पॅट कमिन्स हा आपल्या कुटुंबासह हैदराबादी बिर्याणी खाण्यासाठी गेला होता. यानंतर आता पॅट कमिन्स बिर्याणीच्या चवीने मोहित झाला आहे. हैदराबादच्या कर्णधाराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. यात त्याने हैदराबादी बिर्याणीच्या चवीबाबत माहिती दिली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये बिर्याणीचे भरभरून कौतुक केले.

इन्स्टा पोस्टमध्ये कमिन्सने कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने लिहिले की, "हैदराबादमध्ये कुटुंबासोबत खूप छान दिवस घालवला. भारतात पहिल्यांदाच मी त्यांना हैदराबादी बिर्याणीसाठी बाहेर नेले, खूप छान." इमोजीच्या माध्यमातून त्याने बिर्याणीची चव व्यक्त केली.

कमिन्सच्या नेतृत्वात हैदराबादची दमदार कामगिरी

IPL २०२४ मध्ये सनरायझर्स हैदराबाद खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. या मोसमात धडाकेबाज फलंदाजीसाठी हा संघ प्रसिद्ध झाला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबाद आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल ४ मध्ये आहे. हैदराबादने या मोसमात आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत, ज्यात ५ जिंकले आणि ३ गमावले.

या संघाने आतापर्यंत मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय नोंदवले आहेत.

तर सनरायझर्स हैदराबादला कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या ३ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. या मोसमात कमिन्सच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी करणारा हैदराबादचा संघ मागील हंगामात म्हणजेच २०२३ च्या आयपीएलमध्ये गुणतालिकेत तळाशी म्हणजे १०व्या स्थानावर होता.

गेल्या मोसमात एडन मार्कराम हैदराबादचे नेतृत्व करत होता. मात्र या मोसमात पॅट कमिन्स कर्णधार बनताच संघाच्या स्थितीत बरीच सुधारणा झाली.

IPL_Entry_Point