आयपीएल २०२४ च्या ५८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज आमनेसामने येणार आहेत. हा सामना पंजाबचे होम ग्राऊंड धर्मशाला येथे रंगणार आहे. पंजाबने या मोसमात आत्तापर्यंत ११ सामने खेळले आहेत, ज्यापैकी संघाने ४ जिंकले आहेत आणि ७ सामने गमावले आहेत.
त्याचबरोबर आरसीबीने ७ सामने गमावल्यानंतर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबी संघ पुन्हा लयीत आला आहे.
दरम्यान, पंजाब असो की बंगळुरू, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
यष्टिरक्षक म्हणून जॉनी बेअरस्टो हा एक चांगला पर्याय असेल. बेअरस्टो फॉर्ममध्ये परतला असून त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत आहे. विशेष बाब म्हणजे बेअरस्टो देखील टॉप ऑर्डरमध्ये खेळतो आणि पॉवरप्लेचा फायदा घेऊन तुम्हाला पॉइंट्स मिळवून देऊ शकतो. तुम्ही दिनेश कार्तिकला देखील निवडू शकता. पण, कार्तिक फलंदाजीच्या क्रमात खूपच खाली येतो.
फॅफ डू प्लेसिस, विराट कोहली आणि शशांक सिंग हे फलंदाजीत सर्वोत्तम पर्याय असतील. कोहलीची बॅट चालतच राहते आणि ऑरेंज कॅप त्याच्याकडे आहे. त्याचवेळी फाफने गेल्या सामन्यातही ६५ धावांची शानदार खेळी केली होती. शशांक हा पंजाबचा सर्वोत्तम फलंदाज म्हणून उदयास आला आहे.
सॅम करन, विल जॅक आणि कॅमेरॉन ग्रीन हे अष्टपैलू त्रिकूट तुमच्या संघात असले पाहिजेत. ग्रीन बॅट आणि बॉल दोन्ही तुमच्यासाठी प्रभावी ठरेल. सॅम कुरन ४ षटकांचा स्पेल टाकेल आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीलाही उतरेल.
गोलंदाजीत तुम्ही हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि मोहम्मद सिराज यांना तुमच्या संघात ठेवू शकता. सिराज फॉर्ममध्ये परतला आहे, तर हर्षलनेही गेल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली होती. राहुल चहरसाठी मागील सामना चांगला गेला होता.
यष्टिरक्षक – जॉनी बेअरस्टो
फलंदाज - फाफ डु प्लेसिस, विराट कोहली (कर्णधार), शशांक सिंग
अष्टपैलू - सॅम करन, विल जॅक, कॅमेरून ग्रीन (उपकर्णधार)
गोलंदाज- हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, मोहम्मद सिराज